Homeताज्या बातम्या

मुस्लिम बांधवांच्या सेवाभावाने भारावली ज्ञानेश्‍वर पालखी दिंडी

अहिल्यानगर : आषाढी वारी ही केवळ पंढरीकडे जाणारी पायी यात्रा नसून, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीतील समता, सेवा, प्रेम आणि बंधुभावाचा अखंड प्रवाह आहे

मैत्र ग्रुपला सोबत घेत भविष्यात होतकरू लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार:- प्रशांत शेळके
अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी कारवाई; ‘गर्भलिंग निदान’ प्रकरणी आणखी दोघांना अटक, आरोपींची संख्या २१ वर, ७ डॉक्टरांचा समावेश
ऊस उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड करणार ः राजेंद्र नागवडे
🚩 महाराष्ट्राची शान! श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 | आषाढी वारीचे थरारक क्षण 🚩 लाखो वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर... "ज्ञानोबा ...


अहिल्यानगर : आषाढी वारी ही केवळ पंढरीकडे जाणारी पायी यात्रा नसून, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीतील समता, सेवा, प्रेम आणि बंधुभावाचा अखंड प्रवाह आहे. या परंपरेला साजेसा हृदयस्पर्शी अनुभव शहरातील कोठला परिसरात पाहायला मिळाला. श्रीक्षेत्र नेवासाहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री ज्ञानेश्‍वर पालखी सोहळा दिंडीचे शहरातील मुस्लिम समाज आणि आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशन यांच्या वतीने अत्यंत उत्साहात सेवाभावाने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असल्याचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला.
दिंडीचे कोठला येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात आणि विठ्ठल नामाच्या घोषात दिंडीचे आगमन झाले. हातात पाण्याच्या बाटल्या आणि अल्पोपहार घेऊन उभे असलेले युवक प्रत्येक वारकर्‍याला प्रेमाने हाक मारत होते माऊली… पाणी घ्या… अल्पोपहार घ्या…. हा सेवाभाव पाहून अनेक वारकरी भारावून गेले. काहींनी या उपक्रमाचे कौतुक करत, हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती अशी भावना व्यक्त केली. दिंडीत सहभागी असलेल्या वारकर्‍यांनीही मुस्लिम बांधवांनी केलेल्या आदरातिथ्याला मनापासून प्रतिसाद दिला. अनेकांनी प्रेमाने हस्तांदोलन करुन बंधुभावाचे दर्शन घडविले. काही क्षणांसाठी धर्म, जात, पंथ, भाषा यांचे सर्व भेद विरघळून गेले आणि अवघे एकचि झालो आपण हा संतविचार प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. या स्वागत उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते साहेबान जहागीरदार, नगरसेवक हाजी शहबाज, मुज्जू शेख, सुशांत म्हस्के, मोहसीन शेख, अकबर अली, दानिश शेख, शाहनवाज शेख, शाकिर शेख, शहबाज बॉक्सर, जाकीर तांबोळी, अकदस शेख, साजिद शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS