Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

 संगमनेर : संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा समतेचा व सर्वधर्मसमभावाचा विचार सांगणारे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? या पुस्तकाबाबत बेताल वक्तव्य करणारे शिंदे सेनेचे आ.संजय गायकवाड यांचा निषेध करत शिवगर्जना करून संगमनेर मध्ये डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून नागरिकांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन केले.  संगमनेर मधील नेहरू गार्डन येथे तमाम संगमनेर मधील नागरिकांच्या वतीने शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, छात्र भारतीचे अनिकेत घुले,प्रा.बाबा खरात, विलास कवडे, सोमेश्वर दिवटे यांच्यासह सर्व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शिवाजी कोण होता या सामूहिक वाचनाचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रघुपती राघव राजाराम व वैष्णव जनतो हे भजन गाऊन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिवगर्जनेने पुस्तक वाचनाला प्रारंभ झाला.   यावेळी बोलताना माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, शिंदे सेनेचे आमदाराने केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने निषेध केला पाहिजे आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. असभ्य आणि गुंडगिरी असलेले हे लोक महाराष्ट्राच्या सभागृहात कसे जातात असा सवाल त्यांनी विचारला असून सर्वसामान्य जनतेने आता जागरूक व्हायला पाहिजे. बहुजनांमध्ये बुद्धिमान लोक नाहीत हे दाखवण्यासाठी काही विशिष्ट प्रवृत्ती इतिहास बदलण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.

बातमीत इंग्रजी शब्द आहेत; संजीवनी इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांना नोकरी 
राहुरी तालुक्यात भरदिवसा दरोडा; महिलेवर ब्लेडने हल्ला ; नागरिकांमध्ये भीती
‘निळवंडे’च्या शेजारील पिंपरकणे गावात पाणी टंचाई; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

 संगमनेर : संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा समतेचा व सर्वधर्मसमभावाचा विचार सांगणारे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? या पुस्तकाबाबत बेताल वक्तव्य करणारे शिंदे सेनेचे आ.संजय गायकवाड यांचा निषेध करत शिवगर्जना करून संगमनेर मध्ये डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून नागरिकांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन केले.

 संगमनेर मधील नेहरू गार्डन येथे तमाम संगमनेर मधील नागरिकांच्या वतीने शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, छात्र भारतीचे अनिकेत घुले,प्रा.बाबा खरात, विलास कवडे, सोमेश्वर दिवटे यांच्यासह सर्व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 शिवाजी कोण होता या सामूहिक वाचनाचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रघुपती राघव राजाराम व वैष्णव जनतो हे भजन गाऊन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिवगर्जनेने पुस्तक वाचनाला प्रारंभ झाला. 

 यावेळी बोलताना माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, शिंदे सेनेचे आमदाराने केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने निषेध केला पाहिजे आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. असभ्य आणि गुंडगिरी असलेले हे लोक महाराष्ट्राच्या सभागृहात कसे जातात असा सवाल त्यांनी विचारला असून सर्वसामान्य जनतेने आता जागरूक व्हायला पाहिजे. बहुजनांमध्ये बुद्धिमान लोक नाहीत हे दाखवण्यासाठी काही विशिष्ट प्रवृत्ती इतिहास बदलण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS