Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामेश्वरवाडी शाळेची जिल्हास्तरीय चमकदार कामगिरी; मंथन जनरल नॉलेज परीक्षेत विद्यार्थी ठरले अव्वल

बीड : मंथन जनरल नॉलेज परीक्षा 2026 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामेश्वरवाडी येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात शाळेचा नाव

प्रा. भुजबळ ‘रयत’शी बांधिलकी जपणारे आदर्श शिक्षक : भोस
सूर्यकांत काळे यांच्यासारख्या शिक्षकांची समाजाला गरज-खा.बजरंग सोनवणे;केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सेवागौरव सोहळा थाटात; शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
आठवड शाळेत मंगळवारी प्रवेशोत्सव गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; सातवीचा निरोप समारंभ

बीड : मंथन जनरल नॉलेज परीक्षा 2026 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामेश्वरवाडी येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ही स्पर्धा उत्साहात पार पडली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांचा अनुभव मिळावा व त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
नांदूर घाट परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा नांदूर येथे घेण्यात आली. या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी नियमित सराव, मंथन प्रश्नसंच आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून परीक्षेची प्रभावी तयारी केली. या यशामध्ये शाळेतील शिक्षक श्री. अशोक खोसे सर, श्रीमती वाघ मॅडम, श्री. प्रशांत सुरवसे तसेच श्रीमती मुंडे मॅडम (ट्रेनी शिक्षक) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. या परीक्षेत इयत्ता दुसरीतील चि. रिषभ अमोल धन्वे यांनी केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवत उज्ज्वल यश संपादन केले. तसेच इयत्ता चौथीतील कु. प्रणिता प्रदीप हांगे हिने तृतीय क्रमांक पटकावून शाळेचा गौरव वाढवला. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती तसेच रामेश्वरवाडी ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण गावात या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS