Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुणवंतांचा सत्कार म्हणजे उज्ज्वल भविष्याचा सन्मान : आ. काळे

कोपरगाव : शिक्षणात गुणवत्ता हाच प्रगतीचा खरा पाया आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्तेच्या बाबतीत आपला वेगळा ठसा उमटवला असून हे यश प्राचार्य शाखाप्रमुख गुणवंत शिक्षक आणि रयत सेवकांच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे. म्हणून गुणवंतांचा सन्मान म्हणजे गुणवत्तेचा व उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान आहे असे प्रतिपादन उत्तर विभागाचे विभागीय चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी समन्वय समितीच्या व्यासपीठावरून केले. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्यावतीने आयोजित ‘समन्वय समिती सहविचार व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ प्रसंगी अध्यक्षीय भाषणात आ. काळे बोलत होते.   प्रास्ताविक करतांना नवनाथ बोडखे यांनी शैक्षणिक भौतिक व मूलभूत सुविधांची तपशीलवार मांडणी केली. आजच्या स्पर्धेचा गुणवता हा एकमेव मापदंड समोर ठेवून विभागचे चेअरमन व विभागीय व्यवस्थापन कमिटीच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत आहे. गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून आपण विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून दहा कोटी पेक्षा अधिक शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त केली असल्याचे  त्यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य, बाबासाहेब भोस, कुंडलिकराव दरेकर,ज्ञानदेव पांडुळे,  अनिल  साळुंखे, प्रा. ए. टी. पोकळे, संदीप वर्षे, शिवाजी भोर, पद्माकांत कुदळे, मोहन काकड, अण्णासाहेब शेलार,कारभारी आगवन,मनोज कवडे, सुरेश बोळीज तसेच विभागातील शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, समन्वय समितीचे सदस्य लाईफ मेंबर्स व लाईफ मेंबर्स पालक व पदाधिकारी उपस्थित होते. सुधीर साबळे आणि मंजूश्री धीवर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रमोद तोरणे यांनी आभार मानले.

कोचिंगशिवाय अकोलेचा श्रेयस एमपीएससीत राज्यात दुसरा
शेवगावमध्ये महिलांना चाकूच्या धाकावर लुटण्याचे प्रयत्न; कारवाईची मागणी; नागरिकांचे पोलिसांना निवेदन
नैसर्गिक शेतीसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल उपयुक्त : कुलगुरू डॉ. विलास खर्ची

कोपरगाव : शिक्षणात गुणवत्ता हाच प्रगतीचा खरा पाया आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्तेच्या बाबतीत आपला वेगळा ठसा उमटवला असून हे यश प्राचार्य शाखाप्रमुख गुणवंत शिक्षक आणि रयत सेवकांच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे. म्हणून गुणवंतांचा सन्मान म्हणजे गुणवत्तेचा व उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान आहे असे प्रतिपादन उत्तर विभागाचे विभागीय चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी समन्वय समितीच्या व्यासपीठावरून केले. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्यावतीने आयोजित ‘समन्वय समिती सहविचार व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ प्रसंगी अध्यक्षीय भाषणात आ. काळे बोलत होते. 

 प्रास्ताविक करतांना नवनाथ बोडखे यांनी शैक्षणिक भौतिक व मूलभूत सुविधांची तपशीलवार मांडणी केली. आजच्या स्पर्धेचा गुणवता हा एकमेव मापदंड समोर ठेवून विभागचे चेअरमन व विभागीय व्यवस्थापन कमिटीच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत आहे. गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून आपण विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून दहा कोटी पेक्षा अधिक शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त केली असल्याचे  त्यांनी सांगितले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य, बाबासाहेब भोस, कुंडलिकराव दरेकर,ज्ञानदेव पांडुळे,  अनिल  साळुंखे, प्रा. ए. टी. पोकळे, संदीप वर्षे, शिवाजी भोर, पद्माकांत कुदळे, मोहन काकड, अण्णासाहेब शेलार,कारभारी आगवन,मनोज कवडे, सुरेश बोळीज तसेच विभागातील शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, समन्वय समितीचे सदस्य लाईफ मेंबर्स व लाईफ मेंबर्स पालक व पदाधिकारी उपस्थित होते. सुधीर साबळे आणि मंजूश्री धीवर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रमोद तोरणे यांनी आभार मानले.

COMMENTS