Homeताज्या बातम्या

आमदार बोंढारकरांना ज्येष्ठ नागरिक संघटनेचा ऋणनिर्देशमानधनाच्या प्रश्नावर विधिमंडळातील पाठपुराव्याचे कौतुक

नांदेड ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र विधानसभेत सातत्याने आवाज उठवणारे नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव  बोंढा

यंदा 105 टक्के पाऊस बरसणार !
पीरबु-हान नगर सबस्टेशनवरून श्रेयवाद तापला;उपकेंद्र मंजुरीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना आमनेसामने; नागरिक मात्र अखंडित वीजपुरवठ्यच्या प्रतीक्षेत
संविधानाचा जागर घरोघरी केला पाहिजे : रमेश मकासरे


नांदेड ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र विधानसभेत सातत्याने आवाज उठवणारे नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव  बोंढारकर यांचा उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम, नांदेडच्या वतीने त्यांच्या हिंगोली गेट येथील संपर्क कार्यालयात शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्याप्रती ऋणनिर्देश व्यक्त करून आभार मानले.
फेस्कॉमचे प्रादेशिक अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी सांगितले की, आमदार बोंढारकर यांनी सलग तिसर्‍यांदा विधिमंडळात ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनाचा तसेच इतर प्रलंबित प्रश्नांचा प्रभावीपणे पाठपुरावा केला. लक्षवेधी सूचनेद्वारे ज्येष्ठांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा घडवून आणत त्यांनी केवळ फेस्कॉमच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या अपेक्षांना आवाज दिला असून ही उल्लेखनीय कामगिरी आहे. यावेळी डॉ. हंसराज वैद्य यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह सर्व प्रलंबित मागण्या मार्गी लागल्यानंतर राज्यातील सहकार्य करणार्‍या लोकप्रतिनिधी व शासनाचा गौरव करण्यासाठी लक्षवेधी महा आनंद मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत आमदार बोंढारकर यांनीही समाधान व्यक्त करत सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीत आमदार बोंढारकर यांनी उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या कार्याचे तसेच डॉ. हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणणार असून, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी फेस्कॉमचे प्रादेशिक अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य, सचिव प्रभाकर कुंटूरकर, कोषाध्यक्ष गिरीश बार्हाळे, महिला आघाडीच्या प्रमुख डॉ. लक्ष्मीताई पूरण शेट्टीवार, जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष रामचंद्र कोटलवार तसेच कार्यकारिणी सदस्या डॉ. पुष्पाताई कोकीळ उपस्थित होत्या.

COMMENTS