Homeताज्या बातम्याबीड

राजमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय शेकटा शाळेची दहावी निकालात यशस्वी परंपरा कायम

राजमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय, शेकटा येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची यशस्वी परंपरा कायम राखली आह

कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसर्‍यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोधजिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने सत्कार
बीड येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन उत्साहात  साजरामहामानव अभिवादन ग्रुप वाचाल तर वाचाल वाचनालयातर्फे पी.ई.एस. च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
बीड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था9 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करा – डॉ. गणेश ढवळे यांची आ. संदीप क्षीरसागरांकडे मागणी



राजमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय, शेकटा येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. यावर्षी शाळेतून एकूण 42 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी बहुतेक विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल 88.08 टक्के लागला आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक महानोर ज्ञानेश्वरी नवनाथ हिने 80 टक्के गुण मिळवत पटकावला. द्वितीय क्रमांक महानोर सिद्धेश्वर विठ्ठल याने 79.60 टक्के गुणांसह मिळवला. तसेच तृतीय क्रमांक महानोर स्वाती ज्ञानेश्वर आणि विसरे धनश्री यांनी प्रत्येकी 78.60 टक्के गुण मिळवत संयुक्तरीत्या पटकावला. या यशाबद्दल शाळेचे माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव आबा पंडित, अध्यक्षा सौ. गिरीकाभाभी बदामराव पंडित, माजी सभापती युधाजीत दादा पंडित, सचिव सौ. अनुरूपा युधाजित पंडित, युवानेते यशराज भैय्या पंडित, प्रशासन अधिकारी प्रमोद देसले सर यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS