Homeताज्या बातम्याबीड

चकलांबा ग्रामपंचायतचा अवाढव्य कारभार; रत्नेश्वर महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्यमहादेव मंदिर परिसरात दुर्गंधी; ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

गेवराई तालुक्यातील चकलांबा गावातील रत्नेश्वर महादेव मंदिर परिसर सध्या कचराकुंडीचे स्वरूप धारण करत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. चकलांबा ते ग

मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बीडमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न
बीडमध्ये रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम, अवैध कत्तलखाने प्रकरणी भाजप आक्रमक
पठान शैजूर नजीम खान यांच्या वलीमा रिसेप्शनला मान्यवरांची उपस्थिती; नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव



गेवराई तालुक्यातील चकलांबा गावातील रत्नेश्वर महादेव मंदिर परिसर सध्या कचराकुंडीचे स्वरूप धारण करत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. चकलांबा ते गेवराई या मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या रस्त्यावरून दररोज शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, तसेच शेतीकामासाठी जाणारे शेतकरी मोठ्या संख्येने प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचर्‍यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून अनेकदा ही कुत्री विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा पाठलाग करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते शरद खेडकर यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, चकलांबा ग्रामपंचायतीने कचरा रस्त्यावर येऊ देऊ नये. याचा शाळकरी मुले आणि शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांना तसेच गटविकास अधिकारी सानप यांना वारंवार माहिती देऊनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. जनाची नाही तर मनाची तरी वाटू द्या आणि गावाकडे लक्ष द्या, अशा शब्दांत ग्रामविकास अधिकार्‍यांवर टीका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धार्मिक महत्त्व असलेल्या रत्नेश्वर महादेव मंदिर परिसरात अस्वच्छता वाढल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. गावातील नागरिकांनी तातडीने कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली असून, भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

COMMENTS