Homeताज्या बातम्या

रेल्वे स्थानकाचे टीन शेड कोसळले; टीटीईसह २ प्रवासी गंभीर जखमी

लखनऊ : लखनऊमधील चारबाग रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-५ वरील टीन शेड अचानक कोसळल्याची घटना घडली. या अपघातात एक टीटीई (TTE) आणि २ प्रवासी ग

नांदेडमध्ये मुदतबाह्य औषध विक्रीप्रकरणी तोष्णीवाल मेडिकल्सवर मोठी कारवाई; विना बिल आणि विना फार्मासिस्ट सुरू होता कारभार
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; बीड जिल्ह्यात एकाच दिवशी ३ ठिकाणी छापे, १२ लाखांचा गुटखा जप्त
मृत्यूशी झुंजणाऱ्या १५ वर्षे जुन्या वटवृक्षाचे श्रीगोंद्यात यशस्वी पुनर्रोपण; वृक्षप्रेमींचा स्तुत्य उपक्रम
Lucknow: Tin shed collapses at Charbagh railway station, three injured

लखनऊ : लखनऊमधील चारबाग रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-५ वरील टीन शेड अचानक कोसळल्याची घटना घडली. या अपघातात एक टीटीई (TTE) आणि २ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ (RPF) कडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून तिन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात झाला त्याच वेळी हावडा-डेहराडून एक्सप्रेस (१३०३७) या प्लॅटफॉर्मवर पोहोचली होती, अपघातानंतर या ट्रेनला तातडीने तेथेच थांबवण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत क्रेन पाचारण केली आहे. क्रेनच्या साहाय्याने कोसळलेल्या टीन शेडचा ढिगारा बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

COMMENTS