लैंगिक शोषण करणार्‍यांविरोधातील उपोषणास दाद मिळेना…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लैंगिक शोषण करणार्‍यांविरोधातील उपोषणास दाद मिळेना…

ऑल इंडिया सेंट्रल बँक एससी-एसटी ओबीसी फेडरेशनचे चार दिवसांपासून आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक रुद्र दत्ता आणि मुख्य प्रबंधक चंदन मंगलम यांनी बँकेतील संगमनेर शाखा व्यवस

..तर मग, मुख्यमंत्री व मंत्र्यांचे मानधन बंद करा…
वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य : उर्मिला पवार
उपोषणास बसलेल्यांवर कारवाईची टांगती तलवार…; तहसीलदार देवरेंनी दिला संबंधित कर्मचार्‍यांचा अहवाल

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक रुद्र दत्ता आणि मुख्य प्रबंधक चंदन मंगलम यांनी बँकेतील संगमनेर शाखा व्यवस्थापक पदावरील अविवाहित महिलेशी लगट करून लैंगिक शोषण केल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया सेंट्रल बँक एससी एसटी ओबीसी संघटनेचेवतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मात्र, चार दिवस झाले तरी या आंदोलनाची कोणी दखल घेतलेली नाही. पीडित महिलेचा वेगवेगळ्या ठिकाणी आणि मोबाईल फोनवर लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरून विनयभंग केला आहे. त्याला प्रतिसाद न दिल्याने या महिलेस अंतर्गत शिक्षा करून तिचे अधिकार कुठलेही कारण न देता व न विचारता बेकायदेशीररित्या काढून घेतले आहे व ते त्यांच्यापेक्षा कनिष्ठ पदावरील अधिकार्‍याला देऊन त्याला केबिनमध्ये बसवण्यात आले तसेच दररोज तो कनिष्ठ अधिकारी सर्व ग्राहकांना चुकीची माहिती सांगून महिलेची बदनामी करीत आहे. महिलेला वारंवार अपमानजनक वागणूक देऊन तिचे मानसिक खच्चीकरण करण्यात आले, असा दावा संघटनेने केला आहे.
यासंदर्भात दीड महिन्यापासून संघटनेचे सरचिटणीस अशोक जाधव आणि अध्यक्ष आत्माराम शिंदे यांनी बँकेच्या मुंबई हेड ऑफिसकडे पत्रव्यवहार करूनही न्याय न मिळाल्याने संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पीडित महिलेला न्याय मिळेपर्यंत संबंधित अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात याव्या तसेच त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई बँकेमार्फत करण्यात यावी आणि महिला शाखा व्यवस्थापकाचे काढून घेण्यात आलेले पद व अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित महिलेचे शारीरिक स्वास्थ ढासळले असून ती मानसिक नैराश्याच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यानंतरही पीडितेला होणारा त्रास थांबला नाही व वैद्यकीय रजेवर असताना सुद्धा त्यांना कामावर रुजू होण्यासाठी आदेश देऊन वारंवार दबाव आणण्यात येत आहे, असा दावाही संघटनेने केला आहे.

COMMENTS