Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये गोवंश तस्करांवर कारवाई; ९.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कर्जत : गोवंश जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करून कत्तलीसाठी नेण्याच्या तयारीत असलेल्या तस्करांविरोधात कर्जत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल

पाथर्डीत चोरट्यांचा सुळसुळाट; बंद घर फोडून ७० हजारांची रोकड लंपास
सोनई पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात कारवाई  
भोंदूबाबाला 10 वर्षांची सक्त मजुरी

कर्जत : गोवंश जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करून कत्तलीसाठी नेण्याच्या तयारीत असलेल्या तस्करांविरोधात कर्जत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल ९ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.१० वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांना गुप्त माहिती मिळाली. कर्जत गावाच्या शिवारातील आंतवडा परिसरात परवेज काजी यांच्या घराशेजारील मोकळ्या मैदानात दोन वाहनांमध्ये गोवंश जनावरे भरून ठेवण्यात आली असून ती कत्तलीसाठी नेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे यांना तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यांनी पंचांसह पोलीस पथक घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पहाटे सुमारे ५.५५ वाजता छापा टाकण्यात आला असता माहिती खरी असल्याचे आढळून आले.

घटनास्थळी एमएच ४५ टी ४०९२ क्रमांकाचे बोलेरो मालवाहू वाहन तसेच एमएच १६ एव्हाय २६२८ क्रमांकाचे टाटा एसी वाहन उभे होते. दोन्ही वाहनांमध्ये गोवंश जातीची जनावरे दाटीवाटीने भरलेली असल्याचे दिसून आले. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात चार जर्सी गायी, एक काळ्या-पांढऱ्या रंगाची गाय आणि तीन लहान जर्सी गायी असा सुमारे १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा गोवंश जप्त करण्यात आला. तसेच बोलेरो मालवाहू वाहन आणि टाटा एसी ही दोन्ही वाहने मिळून सुमारे ७ लाख ५० हजार रुपये किमतीची वाहनेही ताब्यात घेण्यात आली. अशा प्रकारे एकूण ९ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अलीम रफिक कुरेशी आणि शोएब अस्लम कुरेशी, दोघेही रा. कुरेशी गल्ली, कर्जत यांच्याविरोधात महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९९५ सुधारित २०१५ मधील कलम ५ (अ)(ब), ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मनीष शिंदे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे, पोलीस हवालदार राजेंद्र थोरात, पोलीस शिपाई दीपक कोल्हे, मनोज मुरकुटे, लक्ष्मण ढवळे तसेच गृहरक्षक दलाचे ऋषिकेश वाघमारे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

COMMENTS