Homeताज्या बातम्या

पत्रकारांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी; शेवगाव पोलीस ठाण्यात पत्रकार बांधवांचे कारवाईसाठी निवेदन

शेवगाव : फेसबुकवरील एका व्हिडिओ पोस्टखाली पत्रकारांविषयी अत्यंत आक्षेपार्ह व अवमानकारक शब्दप्रयोग केल्याच्या निषेधार्थ शेवगाव येथील पत्रकार बांधव

गावठी कट्टे विकणारा कर्जत पोलिसांच्या जाळ्यात दोन गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे जप्त ; ६२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
शेवगाव पोलिसांची धडक कारवाईअवैध वाळू वाहतूक व गोमांस विक्रीवर छापे ; लाखोंचा मुद्देमाल जप्त
कर्जतमध्ये गोवंश तस्करांवर कारवाई; ९.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

शेवगाव : फेसबुकवरील एका व्हिडिओ पोस्टखाली पत्रकारांविषयी अत्यंत आक्षेपार्ह व अवमानकारक शब्दप्रयोग केल्याच्या निषेधार्थ शेवगाव येथील पत्रकार बांधवांच्या वतीने शेवगाव पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव येथील एका व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओखाली पत्रकारांविषयी अवमानकारक व बदनामीकारक टिप्पणी केल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. या प्रकारामुळे पत्रकारितेसारख्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची नाहक बदनामी झाली असून सर्व पत्रकार बांधवांच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर कोणत्याही घटकाविषयी किंवा व्यवसायाविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, असे निवेदनात नमूद केले आहे. कायद्यापुढे सर्वजण समान असल्याने कोणताही राजकीय दबाव न येता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी ठाम भूमिका पत्रकारांनी घेतली आहे. या प्रकारामुळे शेवगाव परिसरातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी असून, संबंधिताविरुद्ध तातडीने कारवाई न झाल्यास पुढील काळात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे.

COMMENTS