Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपुरात डॉ. आंबडेकरांचा भव्य पुतळा उभारणार; माजी खा. डॉ. सुजय विखे ;  ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर : श्रीरामपूरात उभारले जात असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक हे केवळ एक पुतळा नसून ती बाबासाहेबांप्रती असलेली आस्था असेल.हा पुतळा असा देखणा आणि भव्य असेल की, जो कोणी श्रीरामपूरमधून जाईल, त्याच्या मनात बाबासाहेबांबद्दलची निष्ठा अधिक बळकट होईल. बाबासाहेबांच्या कार्याला शोभेल असे भव्य स्मारक उभे करणे, हीच आमची प्राथमिकता असून, येत्या ३ महिन्यांत बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभा राहणार असल्याची ग्वाही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील यांनी येत्या ३ महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा करू, असा शब्द दिला. त्याचबरोबर डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकावरून सुरू असलेल्या श्रेयवादाचा देखील आपल्या अनोख्या शैलीतून समाचार घेतला.  यावेळी पुतळा उभारणीच्या कामावरून होत असलेल्या राजकारणावर डॉ. विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, यामध्ये कोणीही श्रेयावादाची लढाई करू नये. समाज बांधवांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन त्यांचा देखील या पूर्णाकृती स्मारक उभारणीत मोठे योगदान आहे. जे काम शिल्लक राहिले आहे, त्यात आमचा खारीचा वाटा असेल. निदान महामानवांना तरी राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवा, अशी विनंती त्यांनी श्रीरामपूरमधील राजकारण्यांना केली.  पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, पुरस्कार लहान किंवा मोठा नसतो, देणार्‍यांचे मन पाहून मी कार्यक्रमाला येतो. आज मी इथे पुरस्कार घेण्यासाठी नाही, तर स्मारक समितीने जो पुढाकार घेतला आहे, त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.  श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सोहळ्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या पदाधिकार्‍यांसह भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दीपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी,   संजय फंड, नाना शिंदे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पाथर्डीत विविध उपक्रम
गौतम पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश प्रक्रिया संपन्न
राजनंदिनी शिंदे ‘मी ज्ञानी होणार’ स्पर्धेत तिसरी
A grand statue of Dr. Ambedkar will be erected in Srirampur in three  months."

श्रीरामपूर : श्रीरामपूरात उभारले जात असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक हे केवळ एक पुतळा नसून ती बाबासाहेबांप्रती असलेली आस्था असेल.हा पुतळा असा देखणा आणि भव्य असेल की, जो कोणी श्रीरामपूरमधून जाईल, त्याच्या मनात बाबासाहेबांबद्दलची निष्ठा अधिक बळकट होईल. बाबासाहेबांच्या कार्याला शोभेल असे भव्य स्मारक उभे करणे, हीच आमची प्राथमिकता असून, येत्या ३ महिन्यांत बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभा राहणार असल्याची ग्वाही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील यांनी येत्या ३ महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा करू, असा शब्द दिला. त्याचबरोबर डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकावरून सुरू असलेल्या श्रेयवादाचा देखील आपल्या अनोख्या शैलीतून समाचार घेतला.

 यावेळी पुतळा उभारणीच्या कामावरून होत असलेल्या राजकारणावर डॉ. विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, यामध्ये कोणीही श्रेयावादाची लढाई करू नये. समाज बांधवांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन त्यांचा देखील या पूर्णाकृती स्मारक उभारणीत मोठे योगदान आहे. जे काम शिल्लक राहिले आहे, त्यात आमचा खारीचा वाटा असेल. निदान महामानवांना तरी राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवा, अशी विनंती त्यांनी श्रीरामपूरमधील राजकारण्यांना केली.

 पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, पुरस्कार लहान किंवा मोठा नसतो, देणार्‍यांचे मन पाहून मी कार्यक्रमाला येतो. आज मी इथे पुरस्कार घेण्यासाठी नाही, तर स्मारक समितीने जो पुढाकार घेतला आहे, त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.

 श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सोहळ्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या पदाधिकार्‍यांसह भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दीपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी,   संजय फंड, नाना शिंदे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS