Homeताज्या बातम्या

यश फाउंडेशन लायब्ररीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी

शेवगाव : जोहरपूर येथील वनेश्वर हनुमान वस्तीमधील यश फाउंडेशन लायब्ररीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावर

धावपटू के. एम. दीक्षा डोपिंग चाचणीत दोषी; राष्ट्रकुल स्पर्धांपूर्वी भारतीय क्रीडाक्षेत्राला धक्का
चांदा येथील जवाहर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
गावच्या लेक-जावयांसाठी धोंडे जेवण; चौंडीत अनोखा सोहळा, ७०० लेक-जावई आणि हजारो नागरिकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद

शेवगाव : जोहरपूर येथील वनेश्वर हनुमान वस्तीमधील यश फाउंडेशन लायब्ररीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी (दि. ३१) साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, युवक, महिला तसेच लायब्ररीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरवशाली इतिहास उलगडून सांगितला. समाजकल्याण, न्यायप्रिय प्रशासन, धर्मसंवर्धन आणि लोकहिताच्या कार्यांमुळे अहिल्याबाई होळकर यांचे नाव इतिहासात अजरामर झाल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी मान्यवरांनी अहिल्याबाईंच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब महाराज देवढे यांनी केले. यश फाउंडेशनचे संचालक अशोक देवढे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शेवगाव येथील पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर यांनी मुलांना लेझीम संच उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

यावेळी मेजर खेडकर, आसाराम खेडकर, चंद्रकांत वाघ, अशोक पंडित, संदीप वीर, गणेश पंडित, शंकरराव पंडित, बाळासाहेब वाघ, हरिभाऊ माने यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS