Homeताज्या बातम्या

तुलसी आयटी कॉलेजमध्ये नेत्रदानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

बीड : मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यांद्वारे दुसर्‍यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता येतो, हा सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी येथील देवगि

पठान शैजूर नजीम खान यांच्या वलीमा रिसेप्शनला मान्यवरांची उपस्थिती; नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव
बीडच्या शिक्षणाधिकार्याकडून उच्च न्यायालयाचा अवमानशिक्षणाधिकारी व संबंधित लिपिकास उच्च न्यायालयाची नोटीस
आदित्य महाविद्यालयात रुग्णांच्या प्रत्यक्ष सेवेचे मूल्यमापन कार्यशाळाविद्यार्थ्यांच्या क्लीनिकल व व्यावसायिक कौशल्य विकासासाठी 6 तास विशेष प्रशिक्षण.


बीड : मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यांद्वारे दुसर्‍यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता येतो, हा सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी येथील देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बुधवार, दि. 10 जून रोजी नेत्रदान जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती.
या मोहिमेदरम्यान महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचार्‍यांना नेत्रदानाचे सामाजिक महत्त्व, त्याची आवश्यकता तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. याशिवाय नेत्रदानासंदर्भात समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा व गैरसमजुती दूर करण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना नवदृष्टी मिळू शकते, हा संदेश प्रभावीपणे देत उपस्थितांना नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डी.जी. निकाळजे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या मोहिमेत उपप्राचार्य प्रा.अंकुश सुर्वे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सुरेश कसबे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभागी झाले होते.

COMMENTS