Homeताज्या बातम्या

राष्ट्रवादीमुळेच आमची घडी बसली-मोईन मास्टरअजितदादांनी सामान्य भीमकन्येला खुर्चीत बसवून सामाजिक न्यायाचा विचार जपला – प्रेमलताताई पारवे

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27 वा वर्धापन दिन बीड येथील जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. संघर्ष आणि संकल्प हे ब्रीद घेऊन आयोज

अजित पवार अन्यथा फडणवीस होणार मुख्यमंत्री
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
महाराष्ट्राचे पाणी पळवण्याचा कर्नाटकाचा डाव


बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27 वा वर्धापन दिन बीड येथील जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. संघर्ष आणि संकल्प हे ब्रीद घेऊन आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यावेळी नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांनी बोलताना सांगितले की, सामान्य कुटुंबातील एका महिलेला बीडसारख्या महत्त्वाच्या पालिकेत सन्मानाने नेतृत्व करण्याची संधी मिळाली, ती केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांमुळेच शक्य झाली. एका भीमकन्येला नेतृत्वाची संधी देणे हा राष्ट्रवादीचा सामाजिक न्यायाचा विचार आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि मौलाना आझाद यांचा विचार आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत जपणार आहोत, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात ज्येष्ठ नगरसेवक मोईन मास्टर यांनी ध्वजारोहण केले. 1999 मध्ये बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायाभरणी करणार्‍यांपैकी ते एक असून त्यांनी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. राष्ट्रवादीमुळेच आमची राजकीय घडी बसली. पक्षाने बीडकरांना राजकीय स्वाभिमान दिला तसेच विस्थापित आणि सामान्य घटकांना सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्याचे काम केले. अजितदादांनी बीड शहराच्या विकासासाठी जो संकल्प केला आहे, तो पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, नगरपालिकेचे गटनेते फारूक पटेल, शहराध्यक्ष तथा स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे, जिल्हा युवक अध्यक्ष बळीअप्पा गवते, सभापती तथा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख निजाम, माध्यम प्रमुख भागवत तावरे, महिला कार्याध्यक्ष शीतल धोंडरे, नगरसेवक भीमराव वाघचोरे, महेश धांडे, अश्फाक इनामदार, बब्बूभाई, विद्यार्थी आघाडी प्रमुख अजिंक्य, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष गोपाळ धांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर हाच यशवंत विचार – भागवत तावरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयीन प्रमुख भागवत तावरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अजितदादांनी घालून दिलेला आचार आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा समतेचा विचार घेऊन आम्ही आगामी काळात पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करू.

COMMENTS