Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटणा बिहार येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मसूरचा सोहम मोरे सुवर्णपदकाचा मानकरी

मसूर / प्रतिनिधी : अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत मसूर, ता. कराड येथील मल्ल सोहम जगन्नाथ मोरे याने देशात अव्वल क्रमांक मिळवला. 15 वर्षे वयोगटातील 68

सुनील गावसकरांनी घेतला धोनीचा ऍटोग्राफ
या दिग्गज क्रिक्रेटपटूची विमा कंपनी लवकरच बाजारात
टीम इंडियाचा 41 धावांनी शानदार विजय

मसूर / प्रतिनिधी : अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत मसूर, ता. कराड येथील मल्ल सोहम जगन्नाथ मोरे याने देशात अव्वल क्रमांक मिळवला. 15 वर्षे वयोगटातील 68 किलो वजन गटात झालेल्या स्पर्धेत सोहमने महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले. मसूर येथील पशुवैद्यकीय डॉ. जगन्नाथ मोरे यांचा तो मुलगा असून त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोहम पुणे येथील रुस्तुम-ए-हिंद पै. अमोल बुचडे यांच्या तालमीत सराव करतो.
31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत बिहार राज्यातील पाटणा येथे झालेल्या अखिल भारतीय 15 वर्षाखालील रँकिंग कुस्ती स्पर्धेत पै. अमोल बुचडे कुस्ती केंद्र पुणे येथील मल्लांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले. या कुस्ती केंद्रातील तीन मल्लांनी सुवर्णपदक व दोन मल्लांनी ब्राँझ पदक मिळविले. या कुस्ती स्पर्धेत पै. अमोल बुचडे कुस्ती केंद्रातील मल्ल व मसूर गावचा सुपुत्र सोहम जगन्नाथ मोरे याने 68 किलो ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात सुवर्णपदक पटकावले. सोहम हा मध्यमवर्गीय कुटुंबातील पैलवान असून त्याचा कुस्ती स्पर्धेतील यशस्वी आलेख चढता राहिला आहे. सोहमला कोच नरेंद्रकुमार, आनंदकुमार यांच्यासह गुरुवर्य पै. अमोल बुचडे, वस्ताद धोंडीबा लांडगे, डॉ. संतोष पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मसूर ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS