Homeताज्या बातम्याबीड

मोमीन युसरा फातेमा जफर अहेमद दहावी बोर्ड परीक्षेत 93 टक्के गुणांसह शाळेत प्रथमनगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या हस्ते सत्कार

शहरातील नामांकित सर सय्यद अहमद खान सेमी-इंग्लिश शाळेची विद्यार्थिनी मोमीन युसरा फातेमा जफर अहेमद हिने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षे

आजची पिढी अभ्यासू म्हणून गुणवंतांची संख्या वाढतेय-रमेशराव आडसकरसंत तुकाराम पब्लिक स्कुलचा वर्धापन दिन ; समर कॅम्पला प्रारंभ
स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अचूक नियोजनाची गरजआदित्य महाविद्यालयामध्ये मास्टरक्लास संपन्न
आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचा 7 व्या सत्राचा निकाल 100 टक्के यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान



शहरातील नामांकित सर सय्यद अहमद खान सेमी-इंग्लिश शाळेची विद्यार्थिनी मोमीन युसरा फातेमा जफर अहेमद हिने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत 93 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तिचा व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
मोमीन युसरा ही सुरुवातीपासूनच अभ्यासात मेहनती व हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. शाळेत मिळणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच आई-वडिलांचे विशेष लक्ष आणि प्रोत्साहन यामुळे तिने हे यश संपादन केले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध तयारी आणि जिद्दीच्या जोरावर तिने दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवत शाळा व कुटुंबाचे नाव उज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समाजातील विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. यावेळी बोलताना मोमीन युसरा म्हणाली की, पुढील शिक्षणही उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण करून जीवनात यशस्वी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर बनण्याचे माझे ध्येय आहे. आई-वडील, शिक्षकवृंद आणि शाळेचे नाव मोठे करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे.

COMMENTS