Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्या;संगमनेर अवकाळीने झोडपले; माजी मंत्री थोरातांची बांदावर जात पाहणी

संगमनेर : तालुक्यातील पश्चिम भागात रविवारी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याचबरोब

महात्मा फुलेंचे विचार देशाला पुढे नेणारे – माजी आ. तांबे
अवकाळी पावसाने विटभट्टी व्यवसाय उद्ध्वस्त; संगमनेरमध्ये नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी
संगमनेरमध्ये मुस्लीमबांधव उतरले रस्त्यावर | LOKNews24

संगमनेर : तालुक्यातील पश्चिम भागात रविवारी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याचबरोबर अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी  कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. याचबरोबर सरकारने तातडीने पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

 निमज,धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी मा.महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी समवेत जि.प.सदस्य रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, अनिल काळे, बाळासाहेब देशमाने,अरुण गुंजाळ,सागर डोंगरे, मंगेश मतकर, रमेश गुंजाळ, विजय राहणे यांच्यासह गावांमधील विविध कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी थोरात यांनी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली याचबरोबर पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.

 यावेळी बोलताना माजीमंत्री थोरात म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र शेतकरी हा कायम संकटात आहे. मोठ्या अडचणीवर मात करून तो पीक पिकवतो. मात्र अस्मानी संकटामुळे अनेकदा पिके वाया जातात. आलेल्या पिकांना भाव मिळत नाही. अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर जोरदार वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. जनावरांचे गोठे पडले आहेत.

 या भागात डाळिंब, कांदा, मका याचबरोबर उभे असलेले सर्व पिके वाया गेले असून या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सर्व शेतकरी व बाधित नागरिकांना त्वरित भरीव मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली.  

यावेळी धांदरफळ बुद्रुक धांदरफळ खुर्द निमज येथील विविध नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकरी महिलांना झालेल्या नुकसानीमुळे अश्रू आवरता आले नाही. या सर्वांना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी धीर दिला असून सरकारने कोणतेही फार्स न करता तातडीने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS