Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने पेट्रोल-डिझेल खरेदीवर तात्पुरत्या मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अफवांना आळा घालण्यासा

लोकचळवळीने महाराष्ट्र व्यसनमुक्त करूया : मंत्री संजय शिरसाट
राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल व एलपीजी सुरळीत; अफवांपासून दूर राहण्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आवाहन
छ.संभाजीनगरमध्ये रंगला हायहोल्टेज ड्रामा; सभापती निवडीत ठाकरे गट-भाजप भिडले

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने पेट्रोल-डिझेल खरेदीवर तात्पुरत्या मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अफवांना आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, दुचाकी वाहनांना केवळ 200 रुपयांचे पेट्रोल, तर तीन व चार चाकी वाहनांना जास्तीत जास्त 2000 रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करता येणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या मते, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, काही अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त इंधन भरून घेत आहेत, ज्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

COMMENTS