Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयहिंदच्या माध्यमातून विज्ञाननिष्ठ पिढी घडेल :माजी आमदार डॉ. सुधीर तांबे 

संगमनेर : निरोगी आणि सुदृढ समाजनिर्मितीसाठी कार्यरत असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळ’च्या माध्यमातून सक्षम देश निर्माण व्हावा याकरता विज्ञाननिष्ठ पिढी घडवण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केले आहे.  मॉडेल स्कूलमध्ये पाचदिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, 11 ते 16 वयोगटातील 100 विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. आजपासून सुरू झालेले हे शिबिर पुढील पाच दिवस चालणार आहे.  या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी एकलकोंडे होत आहे. खरे तर मुलांनी मैदानाकडे वळले पाहिजे कारण आरोग्य आणि मानसिकता याकरता व्यायाम महत्त्वाचा आहे. सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहण्याकरता सक्षम आणि कणखर मानसिकता महत्त्वाची आहे. यश आणि अपयश पचवण्याबरोबर विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्यासाठी जय हिंद जय हे पाच दिवसीय शिबीर असल्याचे ते म्हणाले. या  शिबिरात विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ विचार, शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बदलत्या युगाशी सुसंगत राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नृत्य, खेळ, योग, ध्यान, वाचन, संवाद कौशल्य आदींचा शिबिरात समावेश करण्यात आल्याची माहिती शिबीराचे प्रमुख  अनंत शिंदे यांनी दिली. या शिबिरात श्री. बजरंग जेडगुले, प्रा. नानासाहेब दिघे, वैभवी प्रेमलता संजय आढाव, प्रा. कोमल मस्के, धनश्री टाकळकर, दिपाली गायके, समाधान जाधव, तेजस पवार,अशा नामांकीत प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे.

प्रज्ञाशोध परीक्षेत समर व सक्षम यशस्वी
शेतरस्ते व मोजणीची २,५०० प्रकरणे प्रलंबित; शरद पवळे; पारनेर भूमिअभिलेखमध्ये सक्षम कर्मचारी नेमण्याची मागणी 
स्वच्छतागृहांसाठी सव्वाकोटींचा निधी मंजूर : नगराध्यक्ष संधान

संगमनेर : निरोगी आणि सुदृढ समाजनिर्मितीसाठी कार्यरत असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळ’च्या माध्यमातून सक्षम देश निर्माण व्हावा याकरता विज्ञाननिष्ठ पिढी घडवण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केले आहे.

 मॉडेल स्कूलमध्ये पाचदिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, 11 ते 16 वयोगटातील 100 विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. आजपासून सुरू झालेले हे शिबिर पुढील पाच दिवस चालणार आहे.

 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी एकलकोंडे होत आहे. खरे तर मुलांनी मैदानाकडे वळले पाहिजे कारण आरोग्य आणि मानसिकता याकरता व्यायाम महत्त्वाचा आहे. सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहण्याकरता सक्षम आणि कणखर मानसिकता महत्त्वाची आहे. यश आणि अपयश पचवण्याबरोबर विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्यासाठी जय हिंद जय हे पाच दिवसीय शिबीर असल्याचे ते म्हणाले.

या  शिबिरात विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ विचार, शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बदलत्या युगाशी सुसंगत राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नृत्य, खेळ, योग, ध्यान, वाचन, संवाद कौशल्य आदींचा शिबिरात समावेश करण्यात आल्याची माहिती शिबीराचे प्रमुख  अनंत शिंदे यांनी दिली. या शिबिरात श्री. बजरंग जेडगुले, प्रा. नानासाहेब दिघे, वैभवी प्रेमलता संजय आढाव, प्रा. कोमल मस्के, धनश्री टाकळकर, दिपाली गायके, समाधान जाधव, तेजस पवार,अशा नामांकीत प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे.

COMMENTS