Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत दोन गटांत तुफान हाणामारी;धारदार शस्त्रांचा वापर, अनेक जखमी

देवळाली प्रवरा : मागील भांडणाच्या कारणावरून राहुरी शहरात दोन गटांमध्ये रविवारी (दि. २९ मार्च) रात्री उशिरा तुफान मारहाण झाली. या हाणामारीत चॉपर,

मजूर पाहायला आलेल्यांना राहुरीत लुटले
तटकरे, पटेल यांना सूचक इशारा!
डीवायएसपी संदीप मिटके यांच्यावर गोळीबार… ‘असा’ घडला थरार… (Video)
The current image has no alternative text. The file name is: Rahuri-Police-Stn.jpg

देवळाली प्रवरा : मागील भांडणाच्या कारणावरून राहुरी शहरात दोन गटांमध्ये रविवारी (दि. २९ मार्च) रात्री उशिरा तुफान मारहाण झाली. या हाणामारीत चॉपर, फायटर व गुप्ती सारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेत चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी शहरातील दोन गटांमध्ये गेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान किरकोळ वाद झाला होता. त्या घटनेचा राग मनात धरून रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पुन्हा वाद उफाळून आला. शहरातील विद्या मंदिर शाळा परिसरात दोन्ही गट समोरासमोर आले आणि क्षणात वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले.

 यावेळी दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर लाथाबुक्क्यांसह हल्ला चढवत चॉपर, फायटर व गुप्ती सारख्या धारदार शस्त्रांनी वार केल्याची माहिती मिळाली. या मारहाणीत दोन्ही गटांतील पाच ते सहा तरुण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 घटनेनंतर राहुरी शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मध्यरात्री दोन्ही गटांतील सुमारे चारशे ते पाचशे युवकांनी फिर्याद नोंदविण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या पथकाने हस्तक्षेप करत जमावाला शांत केले. तसेच शहरात गस्त घालून वातावरण निवळण्याचा प्रयत्न करण्यात आला.या घटनेमूळे मात्र राहुरी पोलिसांचा वचक कमी झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी सोमवारी सायंकाळ पर्यंत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

COMMENTS