Homeताज्या बातम्या

१० जूनपूर्वी मान्सूनच्या आगमनाची शक्यता धूसर; राज्यात वादळी पावसाचा अंदाज, पेरणीची घाई टाळण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून १ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात या बदलांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ,

’ड-ऑन कव्हर’ पुन्हा लागू करण्याबाबत सरकारच्या हालचालीखा.बजरंग सोनवणे यांच्या लोकसभेतील प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे स्पष्टीकरण, ’ड-ऑन कव्हर’ लागू करण्यासाठी खा.सोनवणेंचा पाठपुरावा
पारनेरमध्ये वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; पत्रे उडाले; गोठ्यांची पडझड; गारांनी झोडपले; शेतीचे नुकसान
धुळीच्या वादळासह गारपिटीचा कहर; नांदेड जिल्ह्यात शेती, घरे व गोठ्यांचे मोठे नुकसान
Maharashtra Farmers : १ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची  घाई करू नये - कृषी - Marathi News | Mumbai Tarun Bharat

मुंबई : राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून १ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात या बदलांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातील काही भागांत दुपारनंतर ढगांची गर्दी होऊन वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातही काही ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे.

मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता असली, तरी पूर्व विदर्भातील काही भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, आगामी वादळी पावसाचा आणि मान्सूनच्या प्रगतीचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मान्सून अद्याप केरळ किनारपट्टीवर दाखल झालेला नसून, सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांत किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता दिसत नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मान्सूनपूर्व वादळी पावसाच्या आधारे पेरणीची घाई करू नये, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता जपावी. अशा परिस्थितीत झाडाखाली, पत्र्याच्या शेडखाली तसेच वीज रोहित्र, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS