Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मास्तरच गैरहजर; शिक्षक प्रेरणा परीक्षेला 235 शिक्षकांची अनुपस्थिती

लातूर प्रतिनिधी - शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे तसेच विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी क्षमता अधिक दृढ व्हावी म्हणून तत्का

अरिहंत भगवान मूर्तीच्या अखंड शिलेचे नगरमध्ये स्वागत ; सामूदायिक शांतीमंत्र पठणात पुष्पहार अर्पण
भीमा-कोरेगावप्रकरणी आंबेडकरांची नोंदवणार साक्ष
लिंबू-पाणी विक्रेत्याला दीड कोटीचं वीजबील! l DAINIK LOKMNTHAN

लातूर प्रतिनिधी – शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे तसेच विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी क्षमता अधिक दृढ व्हावी म्हणून तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या संकल्पनुसार शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यात येत आहे. रविवारी शहरातील श्री देशीकेंद्र विद्यालयातील दोन केंद्रावर झालेल्या या परीक्षेला 422 पैकी केवळ 187 शिक्षकांनी उपस्थिती दर्शविली तर 235 शिक्षक अनुपस्थित होते.लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1277 शाळा असून, या शाळांवर 5 हजार 592 शिक्षक कार्यरत आहेत. तसेच अनुदानित खासगी शाळेवर 9 हजार 239 शिक्षक आहेत. एकूण 14 हजार 831 शिक्षकांपैकी 422 जणांनी शिक्षक प्रेरणा परीक्षेस होकार दिला होता. तर उर्वरित शिक्षकांनी परीक्षा देण्यास नकार दिला आहे.
रविवारी सकाळी 10 ते 11 आणि दुपारी 11.30 ते 12.30 या कालावधीत झालेल्या परीक्षेला 422 पैकी केवळ 187 शिक्षक उपस्थित होते. तर 235 शिक्षकांनी अनुपस्थिती दर्शविली आहे. उपस्थितीचे प्रमाण केवळ 44 टक्के असून, सोमवारीही शहरातील श्री देशीकेंद्र विद्यालयातील दोन केंद्रांवर चार विषयांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेला किती शिक्षक उपस्थित राहणार हा प्रश्न आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी सकाळपासूनच केंद्रावर हजर होते. या परीक्षेचा ना निकाल जाहीर होणार, ना कारवाई होणार तरीही हजारो शिक्षकांनी परीक्षेकडे पाठ फिरविली आहे. केंद्र संचालक म्हणून सहायक गटविकास अधिकारी विजेंद्रसिंह मुंढे, किरण कोळपे यांनी काम पाहिले. शिक्षक प्रेरणा परीक्षा तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या निर्णयानुसार घेण्यात येत आहे. परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका सीईओंकडे यापुर्वीच्या आल्या होत्या. प्रत्येक पेपर हा 50 गुणांचा असून, चार उत्तरे चुकली तर एक गुण वजा होणार आहे. एकूण 300 गुणांची ही परीक्षा होत असून, ऐनवेळी परीक्षा देण्यास इच्छुक असणार्‍या शिक्षकांनाही परीक्षेस बसण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, 15 हजार पैकी केवळ 422 शिक्षकांनी परीक्षेस होकार दिला. त्यात परीक्षेला प्रत्यक्षात केवळ 187 शिक्षक उपस्थित राहीले आहेत. 44 टक्के उपस्थितीचे प्रमाण असून, 56 टक्के शिक्षकांनी परीक्षेकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे.

COMMENTS