Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

सहकारभारतीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी हजारे

जामखेड : सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ‘ज्योती क्रांती मल्टिस्टेट’चे चेअरमन आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे

बेल्हे-शिरूर रस्ता अरुंद; निघोज-जवळा परिसरात संताप
अमृतवाहिनी बँकेचा1200 कोटींचा व्यवसाय; माजी मंत्री थोरात;’ बिजनेस समिट २०२६’ उत्साहात
‘आकाशवाणी @ 90’ निमित्त निबंध स्पर्धा उत्साहात; अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध विषयांवर विचारमंथन

जामखेड : सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ‘ज्योती क्रांती मल्टिस्टेट’चे चेअरमन आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांची ‘सहकारभारती’च्या अहिल्यानगर (दक्षिण) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच लोणावळा येथे पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी विविध नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये अजिनाथ हजारे यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी निवड जाहीर करताना  सहकारभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर, प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चाळके, महामंत्री विनोद जुगाडे यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय व प्रदेश स्तरावरील नेते उपस्थित होते. राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सहकारभारती ही सहकार क्षेत्रात काम करणारी सर्वात मोठी संघटना असून, आजिनाथ हजारे यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिक बळ मिळणार आहे.

COMMENTS