Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर शहरातील 3 कोटी 45 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन

इस्लामपूर : रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी ना. जयंत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे, संजय कोरे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, दादासो पाटील, भगवान पाटील, डॉ

माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
पाडेगावच्या नववधूचे आधी लगीन परीक्षेसोबत; परिक्षेनंतर निरेत संपन्न झाला विवाह सोहळा
देशभर केंद्रीय तपास यंत्रणेचा द्वेषापोटी वापर : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर येथील तहसिल कचेरी-जयहिंद टाकी ते आष्टा नाका आणि तहसिल कचेरी-यल्लम्मा चौक ते कापुसखेड नाका या दोन मुख्य रस्त्यासह शहरातील 13 रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून 3 कोटी 45 लाखाचा निधी या कामांच्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व रस्त्यांच्या कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्याच्या सूचना ना. पाटील यांनी दिल्या. शहराच्या त्या-त्या भागातील नागरिकांनी या रस्त्यांच्या कामाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.
मुख्याधिकारी वैभव साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहजी पाटील, गट नेते संजय कोरे, नगरसेवक खंडेराव जाधव, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, प्रा. सौ. अरुणादेवी पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, संदीप पाटील, नगरसेवक संग्राम पाटील, सौ. रोझा किणीकर प्रामुख्याने या रस्ते भूमिपूजन दौर्‍यात सहभागी झाले होते.
शहराच्या मध्यवर्ती असणार्‍या तहसिल कचेरी ते जयहिंद टाकीपासून आष्टा नाक्या पर्यंतच्या 40 लाख रुपयांचा रस्ता तसेच तहसिल कचेरीपासून यल्लम्मा चौकातून कापूसखेड नाक्यापर्यंतच्या 35 लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक 7 मध्ये ओंकार कॉलनी, किसान कॉलनी, भुजुगडे मळा येथे प्रत्येकी 15 लाखाचा रस्ता, प्रभाग 3 मध्ये डॉ. उदय पाटील यांच्या हॉस्पिटलकडे जाणारा रुपये 15 लाखाचा रस्ता, प्रभाग 2 मध्ये राजमाने यांच्या घराशेजारी रुपये 15 लाख, प्रभाग 4 मध्ये आरगे पाटील यांच्या घरासमोर रुपये 15 लाखाचा रस्ता, प्रभाग 10 मध्ये अ‍ॅड. हावळे यांच्या घराशेजारी रुपये 25 लाखाचा रस्ता, संजय कोरे यांच्या जुन्या घरा समोरील रुपये 15 लाखाचा रस्ता, प्रभाग 1 मधील रुपये 8 लाखाचा रस्ता, संभूआप्पा मठा समोर रुपये साडेपाच लाखाचा रस्ता, तसेच खेड रस्त्यावरील 20 लाख रुपयांच्या पाणंद रस्ता आदी रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. संपतराव पाटील, संचालक संजय पाटील, अरुण कांबळे, पिरअली पुणेकर, स्वरूप मोरे, नगरसेविका जयश्री पाटील, जयश्री माळी, सुनीता सपकाळ, कमल पाटील, प्रतिभा पाटील, प्रियांका साळुंखे, अ‍ॅड. धैर्यशील पाटील, शंकरराव चव्हाण, अशोक उरूनकर, केदार पाटील, मुकुंद कांबळे, आयुब हवलदार, रणजित गायकवाड, गोपाळ नागे, शकील जामदार, संदीप माने, बाळासाहेब कोळेकर, विशाल सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी, विनायक सदावर्ते, वैभव भोसले, अवधूत जाखले, जुबेर खाटीक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व त्या-त्या भागातील नागरिक उपस्थित होते.

COMMENTS