Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी समताच्या सचिन भट्टड यांची निवड

कोपरगाव प्रतिनीधी : नॅशनल को-ऑप. क्रेडिट युनियन फेडरेशन ऑफ कोरियाच्यावतीने 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत होणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रशिक्ष

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राहात्याच्या स्मशानभूमीच्या अत्याधुनिकतेचे केले कौतुक
नगर शहरातील करदात्यांना 75 टक्के शास्ती माफी द्यावी : आमदार संग्राम जगताप यांची मागणी
धनादेश न वटल्याप्रकरणी कर्जदारास तीन महिने शिक्षा व पंधरा लाखाचा दंड

कोपरगाव प्रतिनीधी : नॅशनल को-ऑप. क्रेडिट युनियन फेडरेशन ऑफ कोरियाच्यावतीने 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत होणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांची निवड झाली असून कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची माहिती संस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.
      ते पुढे म्हणाले की, कोरिया देशातील सहकारी पतसंस्था चळवळ सर्वात प्रगत, शिस्तबद्ध व सुदृढ समजली जाते. भारतातील सरव्यवस्थापकांपैकी एकमेव निवड  मुलाखतीतून करण्यात झाली आहे. भट्टड यांनी समता पतसंस्थेत क्लार्क पासून ते सरव्यवस्थापक पदापर्यंत स्वकर्तृत्वाने मजल मारली असून गेल्या 25 वर्षापासून संस्थेच्या माध्यमातून ग्राहक, सभासदांना प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. त्यांनी 2015 मध्ये सरव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संस्थेच्या ठेवी 274 कोटी 75 लाख इतक्या होत्या, आज 2023 अखेरीस 881 कोटी 73 लाख इतक्या झाल्या आहेत. समताला भेटी देण्यासाठी येत असलेल्या विविध भागातील पतसंस्था देखील त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवत असतात. त्यांची बँकिंग क्षेत्राच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाते.
      कोरियातील सेऊल येथील मेरियट हॉटेलमध्ये 6 दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञान, नेतृत्व विकास, संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन आदी विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशातून मुलाखतीत सर्वोत्कृष्ट ठरल्यामुळे सचिन भट्टड यांची या प्रशिक्षणासाठी कोरियातील निवास व प्रवास खर्च कोरियन फेडरेशन करणार असल्याचे कोरियन फेडरेशनचे अध्यक्ष व असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे अध्यक्ष योन्सिक किम यांनी कळविले आहे.
       सचिन भट्टड यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, फेडरेशनचे संचालक, पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदन होत असून समता पतसंस्थेचे व्हा.चेअरमन  श्‍वेता अजमेरे, ज्येष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल, अरविंद पटेल, रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे, जितूभाई शहा, गुलशन होडे, निरव रावलिया, कचरू मोकळ, संचालिका  शोभा दरक आणि समता परिवाराच्या वतीने अभिनंदनचा वर्षाव होत असून प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. तसेच देशातील विविध पतसंस्था फेडरेशन कडून ही त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS