Homeताज्या बातम्या

‘स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू’ मोहिमेद्वारे ग्रामीण स्वच्छता व पर्यावरण संवर्धन करा

बीड मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवाहन बीड : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा उपक्रम राबविला जात आहे. स्वच्छतेच्या या

गेवराईत कृषी पंडित भागूजीराव ढेकळे विद्यालयात वृक्षारोपण उपक्रम
चांदे बुद्रुकमध्ये पर्यावरणपूरक वटपौर्णिमा
पर्यावरण संवर्धन हीच काळाची गरज-प्राचार्या डॉ.अश्विनी बेद्रेतुलसी महाविद्यालयात ’वन महोत्सव सप्ताह’ उत्साहात संपन्न
मुख्यपृष्ठ | पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग | भारत

बीड मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवाहन

बीड : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा उपक्रम राबविला जात आहे. स्वच्छतेच्या या चळवळीत सर्व ग्रामस्थांनी स्वतःच्या कुटुंबापासून सहभागी व्हावे. स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत गावाचा ठोस आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जितिन रहमान यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यांच्या सूचनेनुसार ५ जून २०२६ रोजी ‘स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करणे, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतींमधील कंपोस्ट खड्डे, कचरा वर्गीकरण शेड, कचरा संकलन वाहने यांची कार्यस्थिती तपासली जाईल. तसेच जुन्या कचरा डेपोची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची (BWG) यादी तयार केली जाणार आहे. ४ जून रोजी प्रभात फेरी, शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धा, महिला बचत गट संवाद आणि ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण उपक्रम राबवले जात आहेत. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष ग्रामसभांचे आयोजन करून या सर्व कामांचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती जितिन रहमान यांनी दिली.

COMMENTS