बीड : रोटरी क्लब बीड आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नाथापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेंतर्गत सोमवारी (दि. 2

बीड : रोटरी क्लब बीड आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नाथापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेंतर्गत सोमवारी (दि. 27) विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी केला.
रोटरी क्लब बीडचे 2026-27 चे अध्यक्ष सि.ए. श्रीगोपाल लड्डा, सचिव सुहास बेद्रे, आय.पी.पी. विकास उमापूरकर, प्रकल्पप्रमुख विवेक बडगे आणि प्रा. अभय पटवारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक गोविंद सारडा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. अध्यक्षस्थानी नाथ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सतीश बापू शिंदे उपस्थित होते. शाळेचे शिक्षक प्रमोद कुलकर्णी यांचीही यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक गोविंद सारडा आणि प्रमोद कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. रोटरी क्लबच्या वतीने जातीवंत केशर आंबा आणि चिकूची रोपे उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आईच्या नावाने या रोपांची लागवड केली. यावेळी विकास उमापूरकर यांनी वृक्ष फळे आणि सावलीच्या रूपाने सातत्याने देत असतात. त्यामुळे वृक्षांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. प्रकल्पप्रमुख प्रा. अभय पटवारी यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ या संतवचनाचा संदर्भ देत वृक्ष हे माणसाचे विश्वासू मित्र असल्याचे सांगितले. वृक्षांचे जतन म्हणजे येणार्या पिढ्यांचे जतन होय. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून ते जगवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व स्पष्ट करत पालकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. प्राचार्य गोविंद चव्हाण यांनी वृक्षारोपण आणि संगोपनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपण याच शाळेचे विद्यार्थी असल्याने शाळेसाठी योगदान देणे आपले कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी शाळेला 11 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी राजवीर नवनाथ चव्हाण आणि आयुष अमोल पटवारी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब बीडचे अध्यक्ष सि.ए. श्रीगोपाल लड्डा, सचिव सुहास बेद्रे, आय.पी.पी. विकास उमापूरकर, प्रकल्पप्रमुख विवेक बडगे, प्रा. अभय पटवारी, प्राचार्य गोविंद चव्हाण, उपसरपंच सतीश बापू शिंदे, मुख्याध्यापक गोविंद सारडा, शिक्षक प्रमोद कुलकर्णी यांच्यासह रोहिणी बाभूळगावकर, प्रतिभा कुलकर्णी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन रोटरी क्लबच्या वतीने देण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन रोहिणी बाभूळगावकर आणि प्रतिभा कुलकर्णी यांनी केले.

COMMENTS