Homeताज्या बातम्या

स्वारातीम विद्यापीठात ‘वन महोत्सव’ व ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत 100 वृक्षांचे वृक्षारोपण

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे शासनाच्या निर्देशानुसार 1 ते 7 जुलै दरम्यान साजर्‍या करण्य

तुलसी शैक्षणिक समूहात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशवसंतराव काळे कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम



स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे शासनाच्या निर्देशानुसार 1 ते 7 जुलै दरम्यान साजर्‍या करण्यात येणार्‍या ‘वन महोत्सव सप्ताह’ तसेच ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत विद्यापीठ परिसरात 100 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झाला. यावेळी वड, पिंपळ, चिंच, कडूनिंब आणि करंजी यांसारख्या पर्यावरणपूरक व दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी झाडे लावा, झाडे जगवा हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वृक्ष हे पर्यावरणाचा समतोल राखणारे महत्त्वाचे घटक असून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, नवोपक्रम व नवसंशोधन साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. नंदकुमार बोधगिरे, डॉ. लीना गोगटे, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. उषा सांगळे, सहाय्यक कुलसचिव रामदास पेद्देवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उद्यान विभागाचे कर्मचारी तसेच स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यापीठ परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS