Homeताज्या बातम्या

चौसाळा महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी

चौसाळा: चौसाळा येथील कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यां

नीट परीक्षेतून झालेल्या डॉक्टरांची तपासणी मोहीम सुरू करा तकलादू डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रातून हद्दपार करा – एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे
व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य कोषाध्यक्षपदी गायत्री ढवळे
सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सला पुराचा वेढा; परळीतील दोघांसह ४० प्रवासी टपावर, ड्रायव्हर पळाला!

चौसाळा: चौसाळा येथील कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडितराव खाकरे तसेच इतिहास संशोधन केंद्रासाठी बहिस्थ परीक्षक म्हणून उपस्थित असलेले बदनापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाकिर पठाण यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुधाकर वनवे, गणपती ढवळशंक, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सुधाकर देशमुख, डॉ. विलास भिलारे, अनिल शिरसागर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व सामाजिक कार्याचा तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव करण्यात आला.

COMMENTS