Homeताज्या बातम्या

संगमनेरात गांजा विक्रेत्यांवर ‘एलसीबी’चा छापा

संगमनेर : शहरातील जनतानगर परिसरात गांजाची विक्री करणार्या टोळीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत

वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक
धनदांडग्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन; ‘वंचित’चा शेवगाव नगर परिषदेला इशारा
अण्णा हजारे विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी मैदानात; अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलनाला सुरुवात
संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजा विक्रेत्यांवर मोठी कारवाई

संगमनेर : शहरातील जनतानगर परिसरात गांजाची विक्री करणार्या टोळीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 4.13 किलो गांजासह दुचाकी, मोबाईल व इतर साहित्य असा 2 लाख 34 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक संगमनेर शहर परिसरात माहिती संकलन करत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत जनतानगर येथील नम्रता किराणा दुकानासमोर राहणारा संजय ऊर्फ संदीप राजू मालुंजकर हा आपल्या साथीदारांसह घरात गांजाच्या पुड्या तयार करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, सोमनाथ झांबरे व शिवप्रसाद काकडे आणि शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाकडे, पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान, श्रीकांत सावंत, पोलीस अंमलदार आत्माराम पवार, बाबासाहेब सातपुते, राहुल पांडे व संदीप कोंदे यांच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात संजय ऊर्फ संदीप राजू मालुंजकर (वय 26), आकाश विजय क्षीरसागर (वय 29, हल्ली रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) आणि प्रवीण सखाराम पाचकर (वय 28, हल्ली रा. जनतानगर, संगमनेर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

COMMENTS