बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जागतिक दृष्टीदान दिन साजरा करण्यात आला. रोटरी क्लब बीड, जिल्हा शासकीय रुग्णा
बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जागतिक दृष्टीदान दिन साजरा करण्यात आला. रोटरी क्लब बीड, जिल्हा शासकीय रुग्णालय व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक दृष्टिदान दिन साजरा करून त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल बोरा तसेच सचिव डॉ. प्रकाश कोंका, संचालक डॉ. बजाज, सुरेश बुद्धदेव, सौ चंद्रभागा गुरव, सौ.सुप्रिया घरे नेत्र चिकित्सा अधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल आणि शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घरे मॅडम यांनी दृष्टी दान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच डॉ. कौगा व निलेश जगदाळे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल बोरा यांनी दृष्टिदानाबद्दल विद्यार्थ्यांना शपथ दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी देखील दृष्टिदानावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेश्मा मुळे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार डॉ. मीना हंगे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS