महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका… सामनातून पलटवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका… सामनातून पलटवार

प्रतिनिधी : मुंबई महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आपल्या राज्यातील महिला अत्याचार, कायदा-सुव्यवस्था याबाबत चिंता वाटते तशी चिंता

दहशतवादाची पाळेमुळे
कला सन्मान पुरस्काराने राजेंद्र टाक सन्मानित
कृष्णा विश्‍व विद्यापीठाचा शुक्रवारी 11 वा दीक्षांत सोहळा

प्रतिनिधी : मुंबई

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आपल्या राज्यातील महिला अत्याचार, कायदा-सुव्यवस्था याबाबत चिंता वाटते तशी चिंता उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील राज्यपालांना का वाटू नये? 

की तेथील राजभवनाच्या संवेदाना मरून पडल्या आहेत? असा सवाल सामानातून विचारला आहे. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात भाजपाची सरकार आहेत.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यात पुन्हा एकदा लेटर वॉर सुरू झाले आहे. 

महिला सुरक्षेच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवा, असे पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले यावरून शिवसेनेचा संताप झाला आहे.

शिवसेनेने सामनातून भाजपावर टीका केली ‘राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत 

त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच ‘रोल’ अदा करतात आणि अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात. त्याच हत्तीच्या पायाखाली लोकशाही घटना, कायदा, राजकीय संस्कृती तुडवत वेगळे पायंडे पाडले जात असतात. … 

राज्यांतील सरकारे भले त्यांना मानणाऱ्या राजकीय पक्षाची नसोत. त्या राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील घडामोडी हा चूड लावण्याचाच प्रकार आहे. अर्थात, महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका.’

COMMENTS