Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

७० वर्षीय आजोबाचे नातीवर अतिप्रसंगचा प्रयत्न; पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल; भोरमधील हत्येनंतर पुण्यात दुसरी हादरवणारी घटना

पुणे : पुणे शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. भोरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या क

नाव्होली येथे विविध मान्यवरांचा उत्साहात सत्कार
भोंदू मनोहर भोसलेला 3 दिवसांची पोलिस कोठडी; व्यवसायर्चीं नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
संगमनेरमध्ये भोंदूगिरीचा ‘दत्तधाम’ पॅटर्न फसला! वडगावपान येथे पोलिसांची मोठी कारवाई
पोक्सो' : गुन्हेगारांना भीती तर नागरिकांच्या पाल्यांना कवच, जाणून घ्या  सामान्य माहिती

पुणे : पुणे शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. भोरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता पर्वती भागात ७० वर्षांच्या आजोबाने स्वतःच्याच सख्ख्या नातीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
ही घटना पर्वतीच्या पायथ्याशी घडली. नराधम आरोपी अंबादास यल्लाप्पा जाधव याने आपल्या ९ वर्षांच्या नातीला घरात बोलावून घेतले. घराचा दरवाजा आतून लावून घेत त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी, त्याने नातवाला खाऊ आणण्यासाठी पैसे देऊन बाहेर पाठवले होते.
मात्र, आरोपी एका पत्र्याच्या घरात राहत होता. नातीने केलेल्या प्रतिकारामुळे आणि ओरडण्याच्या आवाजामुळे शेजारी राहणाऱ्या एका महिलेचे लक्ष गेले. त्या महिलेने प्रसंगावधान राखत तात्काळ इतर लोकांना बोलावले आणि आरोपीच्या घराचा दरवाजा बडवला. शेजाऱ्यांच्या याच धाडसामुळे एका चिमुकलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आणि मोठा अनर्थ टळला.
या घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक राजेंद्र ससाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अंबादास जाधवर पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे.

COMMENTS