Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

योगेश्वरी शिक्षण संस्थेत मूलींच्या आत्मनिर्भरतेसाठी महिला आत्मभान शिबीर

अंबाजोगाई प्रतिनिधी - योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी आणि श्रीमती खुरसाळे स्मृती न्यास यांच्या संयुक्त विद्यामा नेयोगेश्वरी शिक्षण संस्थेत मूलींच्या आ

जिल्ह्यात…राष्ट्रवादी पुन्हा… सर्वाधिक 83 ग्रामपंचायतींवर सरपंच,
सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीलः शरद पवार
बनावट नोटा कारजवळ टाकून वृद्धला लुटलं; पहा व्हिडीओ l LOK News 24

अंबाजोगाई प्रतिनिधी – योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी आणि श्रीमती खुरसाळे स्मृती न्यास यांच्या संयुक्त विद्यामा नेयोगेश्वरी शिक्षण संस्थेत मूलींच्या आत्मनिर्भरतेसाठी महिला आत्मभान शिबीर प्रशिक्षण शिबिरचे दि.1 मे उद्घाटन झाले.कार्यक्रमाची सुरूवात थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ,पूज्य बाबासाहेब परांजपे व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून झाली.
 योगेशवरी शिक्षण  संस्थेचे अध्यक्ष  डॉ. सुरेश खुरसाळे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.  उद्घाटक म्हणून मा.कु. ऋचा जोशी व मा.कु. रचना परदेशी यांची उपस्थिती होती.तर प्रमुख अतिथी म्हणून श्रावणी निर्मळे, संयोगिता गोचडे,वैष्णवी खाडे, म वैष्णवी नेहरकर, तेजल शितोळे यांची उपस्थिती होती. त्यासोबतच योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनीचे मार्गदर्शक तथा योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ड. शिवाजीराव कर्‍हाड, महिला आत्मभान शिबिराचे संयोजक प्रा. डॉ.प्रवीण भोसले व शिबीर प्रमुख खंडेराव नांदगावकर यांची उपस्थिती होती. कु.ऋचा जोशी यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर ठरताना दिसतात. त्यासोबतच मुलींनी शारीरिक व मानसिकरित्या सक्षम असले पाहिजे. मुली काहीही करू शकतात त्यांच्यासाठी संपूर्ण आकाश खुलं आहे. या प्रशिक्षण शिबिराचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल असे मत मनोगतातून व्यक्त केले. माजी विद्यार्थीनी रचना परदेशी यांनी शिबिरातून मी स्वतः कशी घडले याचे प्रेरक उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवले. आपल्या आयुष्यात हे शिबिर परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास आपल्या मतातून त्यांनी व्यक्त केला. श्रावणी निर्मळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या शिबिरातून तुम्हाला नीतिमत्ता मूल्य शिकायला मिळतील चौकस विचार करण्याची क्षमता हे शिबिर निर्माण करतं असं मत त्यांनी व्यक्त केलं. यासोबतच मा. वैष्णवी खाडे यांनी व्यक्त करताना हॉकी खेळासाठी त्यांनी घेतलेली मेहनत व उभं राहण्याकरिता योगेश्वरी शिक्षण संस्थेचे मिळालेले पाठबळ फार महत्वपूर्ण होतं असं मत व्यक्त केलं. वैष्णवी नेहरकर यांनी आपलं मत व्यक्त करताना शिबिराविषयीचे अनुभव सांगितले. शिबिरातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. याबरोबरच  तेजल शितोळे यांनी आपलं मत व्यक्त करताना माझा सभाधिटपणा शिबिरातून कसा विकसित होत गेला. व सभाधितपणाची आपणाला पुढे जाऊन कशी आवश्यकता पडते याविषयी आपलं मत व्यक्त केलं. आत्मभान शिबिर तुम्हाला कधी आणि कसं विकसित करतं हे देखील कळत नाही. पण ते तुमच्या मध्ये आत्मविश्वास पेरतं. तो आत्मविश्वास तुम्ही उभे राहण्यासाठी फार महत्त्वपूर्ण असतो असे सांगितले. माननीय कुमारी संयोगिता गोचडे यांनी आपले मत व्यक्त करताना स्वतः एनसीसी कडे मी कशी आकर्षित झाले आणि त्यातून ग्रामीण भागातून आलेली असतानाही कशी विकसित होत गेले याविषयीची रंजक माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून शिबिरार्थी माजी विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते.यंदा 262 विद्यार्थिनींनी शिबिर प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यांचे शिबिराचे अनुभव विद्यार्थ्यांना मौलिक ठरले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे सर यांनी पुरुषप्रधान संस्कृती मधून वर्षानुवर्ष महिलांवर होणार्‍या अन्यायाबाबत माहिती दिली. स्त्री शिक्षण आवश्यक असून समाज रचना बदलणे महत्त्वपुर्ण आहे. आज माजी शिबिरार्थी विद्यार्थिनींना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केल्यामुळे कार्यक्रम उत्तम झाला असे मतही त्यांनी व्यक्त केले.मुख्याध्यापक खंडेराव नांदगावकर यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची गोस्वामी यांनी केले, तर आभार प्राध्यापक डॉ.प्रवीण भोसले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सन्माननीय संचालक मंडळ महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक  शिक्षिका, विद्यार्थीनी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

COMMENTS