Homeताज्या बातम्या

दिल्लीतील साकेत नगरमध्ये ३ मजली इमारत कोसळली; थरारक व्हिडिओ समोर!। लोकमंथन News२४

https://www.youtube.com/watch?v=fmi4mya7n2k "अवघे ४५ सेकंद… आणि एक तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली! दिल्लीच्या साकेत नगरमधून एक अत्यंत धक

रिल्सच्या नादात समृद्धीवर भीषण अपघात; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी!
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! जुन्नरमध्ये खेळता खेळता दोन चिमुकले शेततळ्यात कोसळले
धाराशिवमध्ये सुट्टीत आलेल्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

“अवघे ४५ सेकंद… आणि एक तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली! दिल्लीच्या साकेत नगरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक व्हिडिओ समोर आला आहे. एका बाजूला लोक पळतायत, आणि दुसऱ्याच क्षणी डोळ्यादेखत संपूर्ण इमारत जमिनीदोस्त होतेय. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ६ निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.”
“ही भीषण घटना दिल्लीच्या साकेत नगरमधील सैदुलाजब भागात घडली आहे. समोर आलेल्या ४५ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, इमारत कोसळण्यापूर्वीच स्थानिक लोकांना याचा अंदाज आला होता. त्यामुळे लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दूर पळत सुटले. पण काही कळण्याच्या आतच ही ३ मजली कमर्शियल बिल्डिंग कोसळली आणि संपूर्ण परिसरात केवळ धुळीचं साम्राज्य पसरलं.”

COMMENTS