Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसील बीड व एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपदा मित्र-सखी’ प्रशिक्षण कार्यक्रम

बीड । प्रतिनिधी तहसील कार्यालय, बीड व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपदा मित्र-सखी’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे

बीड : मुख्य पाईपलाईनसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !
श्रीक्षेत्र दत्त मंदिराला जाण्यासाठी पायर्‍यांचे बांधकाम पूर्ण; 9 फेब्रुवारीला लोकार्पण सोहळा
बीड नगर परिषद कर्मचार्‍यांच्या आरोग्याशी खेळ झाल्यास महागात पडेल-बाळासाहेब खेमाडे

बीड । प्रतिनिधी
तहसील कार्यालय, बीड व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपदा मित्र-सखी’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून, आपत्ती व्यवस्थापन, प्राथमिक बचाव कार्य, आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य, तसेच जनजागृतीसंबंधी महत्त्वाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी स्वेच्छेने सहभागी होऊ इच्छिणारे खेळाडू, शिक्षक, कर्मचारी, होमगार्डचे सदस्य, सेवाभावी संस्था, तरुण मंडळे तसेच बचाव गटांचे सदस्य यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण पूर्णतः स्वयंसेवी स्वरूपाचे असून, प्रशिक्षणार्थींना कोणताही मोबदला दिला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. आपत्तीच्या वेळी समाजासाठी तत्पर मदत करण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने पात्र व इच्छुक व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासन, बीड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

COMMENTS