Homeताज्या बातम्या

प्राचार्य हेमंत इंगळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

नांदेड : श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, बारड (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील प्राचार्य हेमंत इंगळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,

४०० कोटींच्या घोषणेनंतरही नांदेड स्टेडियमचे भवितव्य अधांतरी; खेळाडूंमध्ये नाराजी वाढली
पत्रकार विनोद डाकोरे यांना ‘युवा पत्रकार गौरव पुरस्कार’ जाहीर; लोहा शहरासह नांदेड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण
महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; विजय निश्चित असल्याचा अशोकराव चव्हाण यांचा दावा


नांदेड : श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, बारड (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील प्राचार्य हेमंत इंगळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या मानव्य विज्ञान शाखेतील इतिहास विषयातील विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली.
प्राचार्य हेमंत इंगळे यांनी इतिहास विषयातील ‘डॉ. श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी यांच्या प्राचीन भारताच्या इतिहासलेखनाचे विश्लेषणात्मक अध्ययन’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. त्यांची अंतिम मौखिक परीक्षा आज पार पडली. यावेळी मानव्य विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, बाह्य परीक्षक डॉ. विष्णू वाघमारे (श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी, जि. सोलापूर), संशोधन मार्गदर्शक डॉ. राहुल वरवंटीकर, तसेच डॉ. संजय झुंबाडे, प्रा. कैलास खानसोळे आणि प्रकाश फाजगे यांच्या उपस्थितीत त्यांना इतिहास विषयातील विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजयराव देशमुख, श्री शितलादेवी सेवाभावी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा  छायाबाई संजयराव देशमुख, दोन्ही संस्थांचे कार्यकारी मंडळ, स्वा. से. राजारामबापू माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रामकिशन चुब्बेवार व सर्व कर्मचारीवर्ग, श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, बारड येथील सर्व प्राध्यापक व कर्मचारी, तसेच शंकरराव देशमुख इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन गव्हाणे व सर्व कर्मचारीवर्ग यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

COMMENTS