Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सव उत्साहात

कोपरगाव तालुका ः  कोपरगाव येथील जुने गांवठाण भागातील मराठा पंच ट्रस्ट मंडळाचे ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात

विद्यार्थिनींनी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू
अहमदनगर मर्चंटस् सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेची कारणे दाखवा नोटीस ; एक कोटी दंडाची टांगती तलवार
महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हिंदूद्रोही : आ. राणेंची टीका

कोपरगाव तालुका ः  कोपरगाव येथील जुने गांवठाण भागातील मराठा पंच ट्रस्ट मंडळाचे ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चैत्र महिन्यातील पौर्णिमेला तिथीनुसार हनुमान जन्मोत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. या वर्षीही पहाटे हनुमान मुर्तीची पुजा करून आरती करण्यात आली.
मंदिराचे सभामंडपात पाळणा ठेवून त्यात बाल हनुमानाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. हनुमान जन्मोत्सव प्रसंगी उपस्थित भजनी मंडळ यांनी भजन, पाळणागीत गायन केले. उपस्थितांना गुळ, बुंदी लाडू प्रसाद वाटप करण्यात आला. या प्रसंगी विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी भद्रा मारुती येथून पायी आणलेल्या भद्रा ज्योतीचे पुजन करण्यात आले.हनुमान जन्मोत्सव निमित्ताने मंदिरात फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई आकर्षक पध्दतीने करण्यात आली होती. हनुमान जन्मोत्सव निमित्ताने मराठा पंचचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शंकरराव आढाव यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर उमाकांत मांडगे परिवाराने चांदीचा टोप हनुमान मुर्तीस अर्पण केला आहे. याप्रसंगी मराठा पंच ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष संजय भोकरे, विश्‍वस्त बाळासाहेब नरोडे, विजय आढाव, प्रकाश गवारे, मंदार आढाव, अ‍ॅड.विद्यासागर शिंदे, कारभारी नजन, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे विजय बंब,ज्येष्ठ नेते विकास आढाव, श्रीमंत पवार सरकार महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, गोरक्षण भजनी मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई ठोंबरे, कविता साळुंके, सारिका कुलकर्णी, संगिता नरोडे, मंदिराचे पुजारी भास्कर ठोंबरे गुरु, साई नरोडे, सचिन गवारे, शेळके, विश्‍व हिंदू परिषदेचे अनिल गायकवाड, बजरंग दलाचे अशोक नायकुटे यांचे सह हनुमान भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS