Homeताज्या बातम्या

कामधेनू असणाऱ्या नागवडे कारखान्याचे जतन करा; चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे आवाहन

श्रीगोंदा : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना हा श्रीगोंदा तालुक्याच्या विकासाची कामधेनू आहे. तिचे संरक्षण व संवर्धन करण्याची साम

साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा : किसान सभा
आंदोलनाच्या इशार्‍यानंतर कारखाना प्रशासन सजगमहिनाअखेर ऊस देयक अदा करण्याचे लेखी आश्वासन
साखर निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक साखर उद्योग संकटात ; किसान सभेची टीका

श्रीगोंदा : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना हा श्रीगोंदा तालुक्याच्या विकासाची कामधेनू आहे. तिचे संरक्षण व संवर्धन करण्याची सामूहिक जबाबदारी संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांची असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी केले.

कारखान्याच्या सन २०२६-२७ या ५२ व्या गळीत हंगामाच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम मंगळवारी (दि. २ जून) कारखान्याच्या इंजिनिअरिंग विभागात पार पडला. कारखान्याच्या व्हाइस चेअरमन मेघा औटी यांचे पती संदीप औटी, संचालक एकनाथराव आळेकर, विश्वनाथ गिरमकर, बंडू जगताप आणि आप्पासाहेब धायगुडे यांच्या हस्ते रोलरची विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी कारखान्यातून सेवानिवृत्त होत असलेल्या २२ कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

राजेंद्र नागवडे पुढे म्हणाले की, दुष्काळग्रस्त श्रीगोंदा तालुक्याला समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी स्व. शिवाजीराव नागवडे यांनी अथक परिश्रम घेतले. प्रास्ताविकात संचालक सुभाष शिंदे यांनी कामगारांचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमास राकेश पाचपुते, श्रीनिवास घाडगे, योगेश भोईटे, कामगार युनियनचे अध्यक्ष राम लबडे, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांच्यासह सर्व खातेप्रमुख, कामगार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत भाऊसाहेब बांदल यांनी केले, तर चीफ इंजिनिअर भरत नलगे यांनी आभार मानले.

गाळप उच्चांकी झाल्यास शेतकऱ्यांना अधिक दर ऊसदराच्या संदर्भात बोलताना राजेंद्र नागवडे यांनी सांगितले की, नागवडे साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याच्या बाबतीत कधीही मागे राहिलेला नाही आणि भविष्यातही राहणार नाही. कारखान्याचे गाळप उच्चांकी झाल्यास शेतकऱ्यांना अधिक चांगला दर देणे शक्य होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

COMMENTS