Homeताज्या बातम्या

गौरी शुगरचे मिल रोलर पूजन उत्साहात

श्रीगोंदा : तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. (युनिट क्रमांक ०४) येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा महत्त्वाचा

युवकांनी समाजविकासत योगदान द्यावे : चिंतामणी  
वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच कर आकारावाआ. आशुतोष काळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
विठ्ठलनामाच्या घोषाने बेलापूर दुमदुमले ! 

श्रीगोंदा : तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. (युनिट क्रमांक ०४) येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या मिल रोलर पूजन समारंभाचा गुरुवार (दि. १८ जून २०२६) रोजी प्रारंभ करण्यात आला. या पूजनामुळे आगामी गळीत हंगामाच्या तयारीला औपचारिक सुरुवात झाली असून कारखाना व्यवस्थापनाने शेतकरी हिताला प्राधान्य देत अधिक कार्यक्षमतेने हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ पार पडला. यावेळी ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बाबुराव बोत्रेपाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करण्यात आली. पारंपरिक धार्मिक विधी आणि मंगलमय वातावरणात मिल रोलरचे पूजन करून गळीत हंगाम २०२६-२७ च्या कामांना प्रारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ओमराजे बोत्रेपाटील म्हणाले की, शेतकरी, कामगार आणि उद्योग यांच्यातील मजबूत समन्वयामुळे ओंकार शुगर ग्रुपने अल्पावधीतच साखर उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरी केंद्रित धोरणांच्या माध्यमातून आगामी गळीत हंगाम अधिक यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच त्यांनी गळीत हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत कारखान्यात सुरू असलेल्या यांत्रिक दुरुस्ती, देखभाल आणि विविध तांत्रिक कामांची माहिती दिली. आगामी हंगामात अधिक क्षमतेने आणि कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्यासाठी आवश्यक सर्व तयारी युद्धपातळीवर सुरू असून कारखाना पूर्णपणे सज्ज राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समारंभास कारखान्याचे जनरल मॅनेजर, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी तसेच तोडणी व वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS