Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी प्रकाश कासट

लातूर प्रतिनिधी - लातूर जिल्हा माहेश्वरी सभेची 2023-2026 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर झाली. यामध्ये लातूर जिल्हा माह

बार्शी टाकळीत हभप अनिरूद्ध गोपाळकृष्ण क्षीरसागर महाराजांचे कीर्तन
शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा
जळगावमध्ये एसटीचा अपघात, 10 प्रवासी जखमी

लातूर प्रतिनिधी – लातूर जिल्हा माहेश्वरी सभेची 2023-2026 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर झाली. यामध्ये लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी सीए प्रकाश कासट यांची सर्वानूमते निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांनी आपला जवळपास 6 वर्ष यशस्वीपणे कार्यकाळ पूर्ण करुन सीए. प्रकाश कासट यांच्याकडे पदभार सोपविला. दरम्यान, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रकाशजी कासट यांनी माहेश्वरी महासभा जिल्हा सचिवपदी फुलचंद काबरा यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी उपस्थित सर्व समाजबांधवांनी टाळ्यांच्या गजरात सर्वांचे स्वागत केले.
शहरातील लाहोटी कंपाउंड येथील लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या कृष्णकुमार लाहोटी सभागृहात मंगळवार, दि. 4 एप्रिल रोजी पद्ग्रहण सोहळा झाला. यावेळी माहेश्वरी समाज, महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, महाराष्ट्र प्रदेश मंत्री मदनलाल मणियार, मराठवाडा विभागप्रमुख संजय मंत्री, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, हुकूमचंद कलंत्री आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नूतन कार्यकारीणीत उपाध्यक्षपदी ओमप्रकाश सारडा, जयप्रकाश खटोड, मधुसूदन सोनी, कोषाध्यक्षपदी जगदिश भुतडा, संघटनमंत्रीपदी विजयकुमार चांडक तर संयुक्त मंत्रीपदी राजगोपाल बाहेती, गोकुळदास चांडक यांची निवड करण्यात आली. तहसील उपाध्यक्षपदी डॉ. राजेंद्र बाहेती (मुरुड), दीपक भुतडा (अहमदपूर) यांची निवड करण्यात आली. याशिवाय महेश आवास प्रकल्प प्रमुख गोविंद कोठारी, सहकोषाध्यक्ष प्रल्हाद चांडक, माहेश्वरी चौक निर्माण प्रमुख गणेश हेड्डा, कार्यालयीन मंत्री चांदकरण लड्डा, अखिल भारतीय सदस्य राजकुमार पल्लोड, हुकूमचंद कलंत्री, फुलचंदजी काबरा, बालकिशन मुंदडा, गोविंद कोठारी. महाराष्ट्र प्रदेश सदस्य ईश्वर बाहेती, दिलीप सोमाणी, रामेश्वर गिलडा, श्यामसुंदर सोनी, नंदकिशोर लोया, बजरंग पल्लोड, गगन मालपाणी, रामेश्वर भराडीया, गोकुळ चांडक, भारत धुत, सहसंघटन मंत्री रामनिवास धुत, महेश बिदादा, पुरुषोत्तम कालिया, आयटी सेलप्रमुख अशोक जाजू, मीडिया व प्रचार मंत्री श्याम भट्टड, सांस्कृतिक व क्रीडा मंत्री विनय भुतडा, आदित्य बिर्ला, जयराम भुतडा, वेल्फेअर प्रमुख सत्यनारायण हेड्डा, ज्येष्ठ नागरिक प्रमुख सत्यनारायण लड्डा, महिला अध्यक्ष मंगल लड्डा, लातूर शहर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नंदकिशोर लोया, विष्णुप्रसाद सारडा, युवा अध्यक्ष दीपक बजाज तर सल्लागार मंडळामध्ये लक्षर्मीरमण लाहोटी, रमेश बियाणी, ईश्वर डागा, सुरेश मालू, सुभाष सोमाणी, मल्लिनाथ लड्डा, लक्ष्मीकांत सोमाणी, रमेश राठी, श्यामसुंदर खटोड यांची निवड करण्यात आली. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रामविलास धुत यांनी केले.

COMMENTS