Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता रक्तासाठीही मोजावे लागते जादा शुल्क

लातूर प्रतिनिधी - राज्य शासनाने दि. 15 फेबु्रवारी 2023 रोजी राज्यातील सरकारी आणि खाजगी रक्तपेढ्यांतील रक्ताचे दर वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. य

बा..विठ्ठला सर्वांना सुखी, समृद्ध कर
शीतल वाली यांनी स्वीकारला वरिष्ठ वित्त विभागीय व्यवस्थापक म्हणून पदभार
चोपडा तालुक्यातील वेले येथे ट्रकने घेतला अचानक पेट

लातूर प्रतिनिधी – राज्य शासनाने दि. 15 फेबु्रवारी 2023 रोजी राज्यातील सरकारी आणि खाजगी रक्तपेढ्यांतील रक्ताचे दर वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानूसार राज्यात रक्तेपेढ्यांनी रक्ताचे दर वाढविले आहेत. दरवाढीमुळे रक्ताच्या एका पिशवीसाठी 1 हजार 100 रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी अनुदानांतर्गत 850 रुपये शुल्क आकारले जात होते. सर्वच महाग होत असल्याने त्याचा पणिाम रक्तपेढ्यांवर होत आहे. त्यामुळे ही दरवाढ केल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगीतले.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पाच वर्षांनंतर रक्तपेढ्यांमधून मिळणा-या रक्ताचे नवे दर जाहीर केले आहेत. यामध्ये 100 ते 350 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना आता रुग्णांना रक्ताच्या दरवाढीसह सामोरे जावे लागत आहे. नव्या दराप्रमाणे एक रक्त पिशवी खरेदी करताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जास्तीचा भूर्दंड पडणार आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या सूचनेनूसार रक्त पिशवीच्या दरवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूढे खाजगी, धर्मदाय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या बाटलीची किंमत 1 हजार 450 रुपये वरुन 1 हजार 550 रुपये इतकी केली आहे. तर सरकारी रक्तपेढ्यांमध्ये 1 हजार 50 रुपयांवरुन 1 हजार 100 रुपये झाली आहे. पूर्वी शासकीय रक्तपेढीत बाहेरच्या रुग्णांसाठी रक्तपिशवी 850 रुपयांना होती. आता शासन निर्णयानूसार रक्तपेढीचे दर 1 हजार 100 रुपये झाले आहेत. लातूर जिल्ह्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यल, शासकीय रुग्णालय या दोन सरकारी तर डॉ. भालचंद्र रक्तपेढी, माऊली रक्तपेढी, अर्पण रक्तपेढी, लातूर ब्लड सेंटर, संजिवनी रक्तपेढी, अंबरखाने रक्तपेढी व राधाई रक्तपेढी या सात खाजगी रक्तपेढ्या असे एकुण नऊ रक्तपेढ्या आहेत. जिल्ह्याला दररोज किमान 50 ते 70 युनिट रक्ताची गरज भासते. त्यापैकी सर्वाधिक रक्त हे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वापरले जाते. राज्यातील सरकारी आणि निमसरकारी रक्तपेढ्यांमधून रक्त आणि रक्त घटकांच्या पुरवठ्यासाठी केंद्र सरकार सेवा शुल्क ठरवते. त्यातच नवीन सुधारित दराचा प्रस्ताव राज्य रक्त संक्रमण परिषदेने पाठवला होता. त्याला गेल्या महिन्यात मंजुरी मिळली आहे. त्यानूसार सार्वजनिक आरोग्य विभागाने रक्ताचे नवे दर जाहीर केले आहेत.

COMMENTS