Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘शरदचंद्रजी पवार’ पतसंस्थेस सव्वादोन कोटींचा नफा

कोपरगाव : तालुक्यातील पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात  नेत्रदीपक कामगिरी केली. २०२५-२६ आर्थिक वर्षात पतसंस्थेला २ कोटी १७ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी करून निव्वळ नफा १ कोटी १४ लाख रुपये इतका झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी दिली आहे.  चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी सांगितले की, सरत्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल २१.६० टक्क्यांची मोठी वाढ झाली असून एकूण ठेवींचा आकडा ५३ कोटी २४ लाखांवर पोहोचला आहे.  आजमितीस ४० कोटी ६८ लाख रुपयांचे कर्ज गरजवंतांना वितरण केले आहे. संस्थेकडे राखीव निधी व इतर फंड एकूण १३ कोटी ७२ लाख रुपयांचे आहे. तसेच संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी ३३ लाख रुपये असून संस्थेची ३० कोटी ३३ लाख रुपयांची भरीव गुंतवणूक आहे.  बँकिंग क्षेत्रात एनपीए कर्जाचे प्रमाण हा चिंतेचा विषय असताना देखील पतसंस्थेने मात्र यावर प्रभावी नियंत्रण मिळवले आहे. संस्थेचे थकबाकीचे प्रमाण केवळ १.३४ टक्के असून ढोबळ एनपीए ३.५२ टक्के आहे. संस्थेने आपला निव्वळ एनपीए सातत्याने ०% राखण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे. संस्थेच्या या उत्कृष्ट कारभाराची दखल घेत आजवर संस्थेला ब्ल्यु रिबीन आणि दीपस्तंभ यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.  पतसंस्थेच्या यशाबद्दल माजी आ. अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांनी संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ, मुख्य व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

काळे कुटुंबाकडून संपूर्ण तालुक्यावरच अन्याय : गोर्डे
अकोलेत ‘फुलोकी होली’ समारंभ उत्साहात
गोदावरी संवर्धनासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय;नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन; कोपरगावात २० कोटींच्या कामांना गती

कोपरगाव : तालुक्यातील पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात  नेत्रदीपक कामगिरी केली. २०२५-२६ आर्थिक वर्षात पतसंस्थेला २ कोटी १७ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी करून निव्वळ नफा १ कोटी १४ लाख रुपये इतका झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी दिली आहे.

 चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी सांगितले की, सरत्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल २१.६० टक्क्यांची मोठी वाढ झाली असून एकूण ठेवींचा आकडा ५३ कोटी २४ लाखांवर पोहोचला आहे.  आजमितीस ४० कोटी ६८ लाख रुपयांचे कर्ज गरजवंतांना वितरण केले आहे. संस्थेकडे राखीव निधी व इतर फंड एकूण १३ कोटी ७२ लाख रुपयांचे आहे. तसेच संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी ३३ लाख रुपये असून संस्थेची ३० कोटी ३३ लाख रुपयांची भरीव गुंतवणूक आहे.

 बँकिंग क्षेत्रात एनपीए कर्जाचे प्रमाण हा चिंतेचा विषय असताना देखील पतसंस्थेने मात्र यावर प्रभावी नियंत्रण मिळवले आहे. संस्थेचे थकबाकीचे प्रमाण केवळ १.३४ टक्के असून ढोबळ एनपीए ३.५२ टक्के आहे. संस्थेने आपला निव्वळ एनपीए सातत्याने ०% राखण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे. संस्थेच्या या उत्कृष्ट कारभाराची दखल घेत आजवर संस्थेला ब्ल्यु रिबीन आणि दीपस्तंभ यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

 पतसंस्थेच्या यशाबद्दल माजी आ. अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांनी संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ, मुख्य व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS