माहूर : माहूर पोलिसांनी अवैध हातभट्टी दारूविरोधात आक्रमक मोहीम सुरू ठेवत कसारपेठ येथे मोठी धाड टाकली आहे. हातभट्टी दारू निर्मितीसाठी साठवून ठेवले

माहूर : माहूर पोलिसांनी अवैध हातभट्टी दारूविरोधात आक्रमक मोहीम सुरू ठेवत कसारपेठ येथे मोठी धाड टाकली आहे. हातभट्टी दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेले रसायन, मोहफुले व अन्य साहित्य पोलिसांनी घटनास्थळीच नष्ट केले. या कारवाईत सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला असून संबंधित शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई गुरुवारी (दि. ११ जून २०२६) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या आदेशानुसार माहूरचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. मौजे कसारपेठ येथील एका शेतातील गोठ्यासमोर लिंबाच्या झाडाखाली हातभट्टी दारू तयार करण्यासाठी प्लास्टिक टाक्या व रसायने साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ धाड टाकून दारू निर्मिती सुरू होण्यापूर्वीच हा प्रयत्न हाणून पाडला.
गावपातळीवरील जबाबदारांना धोक्याची घंटा : या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी कठोर इशारा देताना सांगितले की, नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार एखाद्या गावात हातभट्टी दारू आढळल्यास केवळ गुन्हेगारच नाही, तर संबंधित गावचे पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामसेवक यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहेकॉ प्रकाश गेडाम, सागर डरंगे, ज्ञानोबा खंदाडे व पुष्पा पुसनाके यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

COMMENTS