Homeताज्या बातम्या

नांदेड पोलिसांचा अवैध धंद्यांवर धडक प्रहार; ’मास रेड’मध्ये ३६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड: जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी राबविलेल्या ’मास रेड’ मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमा

नांदेडमधील कोचिंग क्लासेस व शैक्षणिक संस्थांची सुरक्षा रामभरोसे? लखनौ दुर्घटनेनंतर अग्निसुरक्षा तपासणीची मागणी
गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित कराकत्तलखाने व मांस निर्यात बंदीच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बीड शहराचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न पुन्हा सभागृहात; २० दिवसांआड येणारे पाणी २ दिवसांवर आणण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी महावितरणला वर्ग करण्याची आ. संदीप क्षीरसागर यांची मागणी

नांदेड: जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी राबविलेल्या ’मास रेड’ मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्हाभर एकाच वेळी टाकण्यात आलेल्या सत्रबद्ध छाप्यांमध्ये ३६ लाख ६० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, विविध गुन्ह्यांप्रकरणी ४५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सुरू असलेले अवैध दारू विक्रीचे अड्डे, हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री, जुगार अड्डे तसेच बेकायदेशीर रेती उत्खनन व वाहतूक करणार्‍यांविरुद्ध मंगळवारी (दि. २३ जून) ही विशेष मोहीम राबविण्यात आली. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संशयित ठिकाणी एकाच वेळी धाड टाकून पोलिसांनी अवैध धंद्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेदरम्यान एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले.

कारवाईत हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य, मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा, जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य तसेच बेकायदेशीर रेती वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करण्यात आली. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३६ लाख ६० हजार ८५० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही मोहीम पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक (नांदेड) सूरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि अंमलदार यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आली.

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत अशा प्रकारच्या ’मास रेड’ मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने दिली. या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून, कायद्याचा धाक निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलिसांची ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.

COMMENTS