Homeताज्या बातम्या

हबीबिया कॉलनीतील ’कल्याण क्लोज’वर पोलिसांचा धडक छापा; १.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांवर गुन्हा

नांदेड: अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नांदेड ग्रामीण पोलिसांनी हबीबिया कॉलनीतील बंद घरात सुरू असलेल्या ’कल्याण क्लोज’ मटका जुगा

छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त बीडमध्ये ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन; समता परिषदेचा पुढाकार
कर्जमुक्तीसोबतच नैसर्गिक शेतीकडे वळा; शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन, अहिल्यानगरमध्ये नऊ हजार हेक्टरवर नैसर्गिक शेती
पाण्याचा घोट, हरिपाठाची भेट; दत्ता वाकसे यांची वारकर्‍यांना प्रेमाची साथ! मकरध्वज दिंडीला महाप्रसाद
चोरी गेलेले साहित्य सिडको ग्रामीण पोलिसांनी सन्मानपूर्वक केले परत -  Lokmanthan | लोकमंथन

नांदेड: अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नांदेड ग्रामीण पोलिसांनी हबीबिया कॉलनीतील बंद घरात सुरू असलेल्या ’कल्याण क्लोज’ मटका जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत संपूर्ण रॅकेटलाच हादरा दिला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य व इतर वस्तूंसह तब्बल १ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयीन परवानगी घेऊन पंचांसमक्ष छापा टाकला. पोलिसांचा फौजफाटा पाहताच अड्ड्यावर एकच गोंधळ उडाला. काही जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दोन आरोपींना घटनास्थळीच ताब्यात घेतले, तर सहा जण अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची माहिती आहे.

कारवाईदरम्यान रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल, लोखंडी कपाट, टेबल, फायबर खुर्च्या तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी एकूण आठ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू असून त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहर व परिसरातील बेकायदेशीर मटका व्यवसाय चालविणार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत अशाच स्वरूपाच्या आणखी धाडसत्राची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी या अवैध साखळीशी संबंधित इतर व्यक्तींचाही तपास सुरू केला आहे.

COMMENTS