Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होणार का? ग्रामस्थांमध्ये संभ्रम

हदगाव तालुक्यातील शिरड येथील गाव तलाव ते पेवा दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा अ

मेंडकीच्या जिल्हा परिषद शाळेला तलावाचे स्वरूपसाचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; पेव्हर ब्लॉक टाकण्याची ग्रामस्थांची मागणी
चौकशीचा फार्स की कारवाईची तयारी?मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामसेवकांवर ’मुंढे पॅटर्न’ लागू होणार का?सीईओ विशाल पाटील यांच्याकडून कठोर निर्णयाची ग्रामस्थांना अपेक्षा
अधिकारांविना ग्रामपंचायत प्रशासक निष्क्रियविकासकामे ठप्प; अधिकार द्यावेत किंवा अधिकारी प्रशासक नेमण्याची ग्रामस्थांची मागणी



हदगाव तालुक्यातील शिरड येथील गाव तलाव ते पेवा दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हे काम वेळेत पूर्ण होणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम करून गिट्टी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र एका बाजूला मुरूम टाकून त्यावर गिट्टी अंथरण्यात येत असताना दुसर्‍या बाजूला मुरूम न टाकताच थेट गिट्टी टाकली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. संबंधित ठेकेदाराकडून नियमांना बगल देत केवळ गिट्टी पसरवून काम उरकले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण झाले तरी रस्ता टिकाऊ आणि दर्जेदार राहील का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने कामाची तातडीने पाहणी करून दर्जेदार काम करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

COMMENTS