Homeमहाराष्ट्रअहमदनगर

गाडगेबाबांच्या विचारांची परंपरा जपणार्‍या सभेत फुले जयंती उत्साहात; बारुळकरांना श्रद्धांजली

कृतिशील समाजसुधारक, सत्यशोधक धर्माचे संस्थापक आणि शैक्षणिक-सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड

17 एप्रिल रोजी बीड येथे भव्य एल्गार मोर्चागेवराई तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-अलीम सय्यद
मुख्याध्यापकांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा; विद्यार्थ्यांना ‘एक्झाम पॅड’चे वाटपसामाजिक कार्यकर्ते मुसाखान पठाण व शेख वसीम यांचा आदर्श उपक्रम
मुस्लिम नेते शेख युनूस यांचा राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप; जिल्ह्यातील नेत्यांवर प्रश्नचिन्ह



कृतिशील समाजसुधारक, सत्यशोधक धर्माचे संस्थापक आणि शैक्षणिक-सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. याच वेळी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे किर्तन व प्रवचनातून जनप्रबोधन करणारे ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांच्या अकाली निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गाडगेबाबांच्या समाजसुधार चळवळीची परंपरा पुढे नेणारे ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे यांच्या निवासस्थानी आयोजित या अभिवादन सभेला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून फुले यांच्या विचारांना वंदन केले तसेच बारुळकर महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक नेते व मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक प्राचार्य डी. जी. तांदळे, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अशोक येडे, प्रबोधनकार ह.भ.प. नितीन महाराज पिसाळ, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, पर्यावरणप्रेमी अभिमान खरसाडे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गणेश मस्के, लेक लाडकी अभियानाचे समन्वयक बाजीराव ढाकणे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. पंजाब येडे तसेच अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे यांनी मानले, तर संचालन ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज उबाळे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपत समाजप्रबोधन अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली.

COMMENTS