Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दैनिक अल्हीलाल समूहाचा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा 9 मे रोजीऑल इंडिया मुशायरा आणि वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरणही होणार

पत्रकारितेसोबतच उर्दू साहित्याला प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने करणार्‍या दैनिक अल्हीलाल समूहाच्या वतीने यंदाही भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्याच

बीडमध्ये पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या
काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी!बीड जिल्हा पदाधिकार्‍यांच्या निवडींना वेग; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन
श्री बंकटस्वामी महाविद्यालयात कर्मयोगी शिवगंगा सोनेकर यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न



पत्रकारितेसोबतच उर्दू साहित्याला प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने करणार्‍या दैनिक अल्हीलाल समूहाच्या वतीने यंदाही भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या 9 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता बीड शहरातील मिलत उर्दू प्राथमिक शाळा, बार्शी नाका येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाबाबत माहिती देताना समूहाचे संस्थापक खमरुल इमान खान यांनी सांगितले की, 2007 पासून समूहाच्या वतीने दरवर्षी उर्दू साहित्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यावर्षी 31 जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता नव्या तारखेनुसार 9 मे रोजी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार असून यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच 24 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरणही याच सोहळ्यात होणार आहे. कार्यक्रमाच्या दुसर्‍या टप्प्यात रात्री 7:30 वाजता ‘ऑल इंडिया उर्दू मुशायरा’चे आयोजन करण्यात आले असून देशभरातील नामवंत उर्दू कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. हा मुशायरा कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. बीड शहरातील उर्दूप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उर्दू दैनिक अल्हीलाल समूह, बज्म-ए-शमा अदब, इंदिरा गांधी व पीपल्स स्कूल्स तसेच मिलत ग्रुप ऑफ स्कूल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS